ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमोल पालेकर यांना झालेल्या एका दीर्घ आजारवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी दिली आहे. 10 वर्षांपूर्वीही त्यांना याच आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर उपचार सुरु होत असून आता काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नसल्याचं अमोल पालेकर यांची पत्नी संध्या गोखले यांनी म्हटलंय.
अमोल पालेकर यांना अतिधुम्रपान केल्यामुळे त्रास झाला होता. त्यामुळे 10 वर्षांपूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.