Friday, November 1, 2024
Homeआंतरराष्ट्रीयआदित्य L-1 ने घेतली अंतराळातून सेल्फी , इस्रोने शेअर केले फोटो

आदित्य L-1 ने घेतली अंतराळातून सेल्फी , इस्रोने शेअर केले फोटो

आदित्यला सूर्याच्या कक्षेत जाण्यासाठी किती दिवस लागणार?. सध्या हे यान पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत आहे. जिथे पृथ्वी आणि सूर्याची गुरुत्वकर्षण शक्ती समतोल आहे. तिथे इस्रो यानाला स्थापित करेल.

चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताच सध्या आदित्य L-1 मिशन सुरु आहे. आदित्य एल 1 ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे. मागच्या शनिवारी आदित्य एल 1 च आंध्र प्रदेशच्या श्री हरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. आदित्य एल 1 ला सूर्याच्या कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या हे यान पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत आहे. आदित्य एल 1 वर आतापर्यंत दोन मॅन्यूव्हर झाले आहेत. म्हणजे चांद्रयान-3 प्रमाणे आदित्य एल 1 चा टप्याप्याने कक्षा विस्तार सुरु आहे. आदित्य एल -1 ला हळूहळू पृथ्वीच्या कक्षेपासून लांब नेलं जात आहे. आदित्य एल-1 ने सध्या सुरु असलेल्या प्रवासात काही फोटो काढले आहेत. आदित्य एल-1 15 लाख किलोमीटर पर्यंतचा प्रवास करायचा आहे.

सूर्य आणि पृथ्वीच्यामध्य़े लॅगरेंज पॉइंट आहे. तिथे आदित्य एल-1 ला स्थापित करण्यात येईल. L-1 पॉइंटवरुन सूर्यावर पूर्णवेळ लक्ष ठेवता येईल. या पॉइंटरवरुन कुठल्याही ग्रहणाचा प्रभाव, परिणाम सूर्यावर दिसणार नाही, फक्त सूर्यावर जे काही घडत ते समजेल. आदित्य एल 1 उपग्रह एकप्रकारे इस्रोची सूर्याजवळची वेधशाळा असेल. सूर्यावर बरच काही घडत असतं. सूर्यावर वादळ येतात. अजून तिथल्या बऱ्याच घडामोडी समजणार आहेत. L-1 ही अवकाशातली अशी जागा आहे, जिथे पृथ्वी आणि सूर्याची गुरुत्वकर्षण शक्ती समतोल आहे. तिथे इस्रो यानाला स्थापित करेल. 2 सप्टेंबरला PSLV रॉकेटने आदित्य एल-1 ला प्रक्षेपित केलं. 16 दिवस आदित्य एल-1 पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल.

फोटोमध्ये काय दिसतय?

इस्रोने आदित्य एल-1 ने काढलेले फोटो रिलीज केले आहेत. आदित्य एल-1 ने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो काढले आहेत. सेल्फीमध्ये आदित्यमधील VELC आणि SUIT हे दोन पेलोड दिसतात. आदित्यने पृथ्वीचा जवळून फोटो काढला आहे. यात चंद्र दूर अंतरावर दिसतोय.

भारताच चांद्रयान-3 मिशन सुद्धा यशस्वी ठरलं आहे. 23 ऑगस्टला चंद्रावर सॉ़फ्ट लँडिंग केल्यानंतर चांद्रयान 3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. सध्या दोघेही स्लीपर मोडमध्ये आहेत. 22 सप्टेंबरला चंद्रावर सूर्यप्रकाश आल्यानंतर लँडर आणि रोव्हर पुन्हा काम करणार का? याची उत्सुक्ता आहे. कारण लँडर आणि रोव्हरची रचना 14 दिवसांच्या हिशोबाने करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments