Tuesday, February 18, 2025
Homeताजी बातमीबिग बॉस मराठीचा सीझन ५ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला...!

बिग बॉस मराठीचा सीझन ५ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला…!

बिग बॉस मराठी’ सीझन ४ ने प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. आता पुढील सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक असणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. बिग बॉस मराठी कधी सुरु होणार हे ऐकण्यासाठी कित्येक प्रेक्षक उत्सुक असतात. नुकताच ‘बिग बॉस मराठी सीझन ४’ ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तीन महिन्यांचा कालावधी असलेल्या या कार्यक्रमात अभिनेता अक्षय केळकर सीझन ४ चा विजेता ठरला. तर अपूर्वा नेमळेकर उपविजेती ठरली. किरण माने तिसऱ्या स्थानावरून घराबाहेर पडले. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’ चा पुढील सीझन कधी येणार याची अनेकांना उत्सुकता होती. आता त्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. महत्वाचं म्हणजे या सीझनचं काम सुरू झालं आहे. वाचा कधी सुरू होऊ शकतो ‘बिग बॉस मराठी ५’.

कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’ने मागील सगळेच सीझन गाजवले आहेत. त्यातही पहिले दोन सीझन प्रेक्षकांचे आवडते ठरले. आता पुढील सीझनबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीझन ५ च्या सेटचं काम सुरू झालं आहे. मराठी बिग बॉसचा सीझन ४ संपल्यावर त्या सेटवर ‘बिग बॉस मल्याळम’ हा कार्यक्रम सुरू होता. आता ७ जुलै रोजी ‘बिग बॉस मल्याळम’चा महाअंतिम सोहळा पार पडला. त्यानंतर आता त्या सेटवर ‘बिग बॉस मराठी ५’ च्या घराचे काम सुरू झाले आहे. हे संपूर्ण काम सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होऊ शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिना अखेर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ‘बिग बॉस मराठी ५’ सुरू होऊ शकतो.

या वेळेसही बिग बॉस ओटीटी संपल्यावर हिंदी बिग बॉसचा पुढील सीझन सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदी बिग बॉस आणि मराठी बिग बॉस एकमेकांसोबत क्लॅश होऊ शकतात अशी शक्यता सांगितली जातेय. सोबतच मराठी बिग बॉसचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर करतील असंही म्हटलं जातंय.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments