Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमीचिंचवडला कारने अचानक घेतला पेट, मनुष्यहानी नाही ,कुटुंब सुखरुप

चिंचवडला कारने अचानक घेतला पेट, मनुष्यहानी नाही ,कुटुंब सुखरुप

२ जानेवारीं २०२०,
बुधवारी मध्यरात्री चालत्या मोटारीला अचानक आग लागल्याने एका कुटुंबावर मोठे संकट ओढवले होते. मात्र, वेळीच प्रसंगावधान दाखवत यातून प्रवास करणाऱ्या कुटुंबातील तीन महिलांसह एका लहान मुलीला बाहेर काढण्यात यश आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मोटारीतून बडवाने कुटुंब एक कौटुंबिक कार्यक्रम उरकून पुण्याहून निगडीच्या दिशेने जात होते. तेव्हा, वेगात असणाऱ्या मोटारीला अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, कार जळून खाक झाली. वेळीच प्रसंगवधान दाखवत कुटुंबातील तीन महिलांसह एका लहान मुलीला बडवाने यांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कार मालक सतीश तुकाराम बडवाने (वय ६०) हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह पुण्याहून आपल्या निगडीतील घरी निघाले होते. मोटारीत ते स्वतः तीन महिला आणि एक लहान मुलगी असे पाच जण होते. मारुती सुझुकी कंपनीची ही कार धावत असताना बोनेटमधून अचानक धूर येऊ लागला. त्यानंतर सतीश यांनी हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीच्या समोर मोटार थांबवून प्रसंगवधाव दाखवत महिला आणि लहान मुलीला बाहेर काढले.

दरम्यान, तत्काळ कारने मोठा पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचत राजाराम चौरे, राजेंद्र गवळी, लक्ष्मण होवाळे, अमोल चिपळूणकर, सरोप फुंदे, सदाशिव मोरे या अग्निशमनच्या जवानांनी कार्य सुरु केले आणि आग आटोक्यात आणली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments