Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीउद्या पासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा...

उद्या पासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा सुरु होणार..

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमातील १ली ते ७ वी पर्यंतच्या सर्व शाळा उद्या गुरुवार दिनांक १६ डिसेंबर २०२१ पासून सुरु होणार आहेत. याबाबतचा आदेश महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे, दरम्यान विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांना घ्यावी लागणार आहे.

राज्य सरकारने १ डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याची मान्यता दिली होती. परंतु, कोरोनाचा ‘ओमायक्रॉन’ हा नवीन व्हेरिएंट आला. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली. त्यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

कोरोना नियमांबाबत उपाययोजना शाळेत स्वच्छता, निर्जंतुकीकरण विषय सुविधा सुनिश्चित कराव्यात. जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धतता करावी लागणार आहे. ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत. अशांना ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळा दप्तरी ठेवावे. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. वर्ग खोली, स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments