भारतीय हवामान विभागाने पुढील 3 तासांमध्ये पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे. पुण्याच्या काही भागांमध्ये पुढच्या तीन तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं, असं हवामान विभागाने सांगितलं आहे.मुंबईमध्येही मुसळधार पाऊस बरसल्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन विस्कळित झाली होती. मागच्या 24 तासांमध्ये मुंबई उपनगरात अतिमुसळधार पाऊस झाला आहे. मुंबईत 24 तासात 2,68,300 मिली मीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद जाली आहे.
दुसरीकडे रत्नागिरीमध्ये आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.मुंबईमध्ये पुढील एक दिवस ढगाळ वातावरण राहिल तसंच हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट दिला आहे.
रत्नागिरीत दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून काजळी नदी ही इशारा पातळीच्या वरती वहात आहे. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते. नदीच्या बाजूला असलेल्या मानवी वस्तीला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे. गेला 24 तासात कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्र बाहेर गेल असून पंचगंगा नदीची वाटचाल सध्या इशारा पातळी कडे सुरू आहे. जिल्ह्यातले 55 बंधारे सध्या पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, पण जुलै महिन्यात मात्र पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाच्या प्रमाणात 300 मिली जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.मराठवाडा आणि विदर्भातही चांगला पाऊस पडतोय, त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे.