Wednesday, June 18, 2025
Homeताजी बातमीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बसविण्यात येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे काम...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बसविण्यात येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या ३ जानेवारीला बसवण्यात येणाऱ्या सावित्रबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मुख्य परिसर असलेल्या मुख्य इमारत येथे हा पुर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी नुकतीच पुणे विद्यापीठात सुरु असलेल्या कामाचा आढावा घेऊन पाहणी केली.

अगदी काही दिवसांवर सावित्रीबाई फुलेंची जयंती आल्याने विद्यापीठात अतिशय जलद गतीने काम सुरु असून हे काम अतिंम टप्यात आहे. कात्रज येथे परदेशी आर्ट स्टुडीओ येथे भेट देऊन पुतळ्याच्या कामाची पाहणी करत मूर्तिकार परदेशी यांच्याकडूनही कामकाजाची माहिती भुजबळ यांनी घेतली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येत आहे. यावेळी समीर भुजबळ यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्या समवेत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चाही केली.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, प्राचार्य संजय चाकणे, विद्यापीठातील आर्किटेक्ट साळसकर, मूर्तिकार परदेशी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे, वैष्णवी सातव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, उपाध्यक्ष हर्षल खैरणार, प्रदीप हुमे, शिवराम जांभुळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठ त्यांचा पुतळा कुठं बसवायचा यावरून समितीमध्ये मतभेद होते . मात्र विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या परिसरातच हा पूर्णआकृती पुतळा बसवण्याचे निश्चित झाले. विद्यापीठात हा पुतळा नेमका कुठे बसवावा यासाठी अनेक जागा सुचवण्यात आल्या आहेत. परंतु सर्वानुमते मुख्य इमारतीच्या जवळपासच हा पुतळा असावा असे सुचवण्यात आल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी केली होती.

सावित्रीबाई फुले यांचा विद्यापीठात पुतळा बसवत असताना दुसरीकडं शहरातील ज्या भिडेवाड्यात सावित्रबाईनी मुलींची पहिली शाळा घेतली तिथेही शाळा उभारण्यात येणार आहे. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुणे महानगर पालिकेच्या वतीनेही शाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आवश्यक जागेचे संपादनही ही केले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments