सत्यम ज्वेलर्स – 42 वर्षांचा विश्वास, आता नव्या तेजाने
पिंपरी-चिंचवडमधील दागिन्यांच्या जगतात एक विश्वासार्ह नाव म्हणून ओळखलं जाणारं सत्यम ज्वेलर्स आपल्या ४२ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीनंतर आता नव्या युगात पदार्पण करत आहे. २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता, निगडी येथील त्यांचं नूतनीकरण केलेलं भव्य आणि आधुनिक दालन ग्राहकांसाठी खुले होणार आहे.
ही केवळ वास्तूची नविन सजावट नाही, तर एका अनुभवाची निर्मिती आहे — जिथे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दिसून येतो. यामध्ये खास “ब्राइडल लाउंज” सादर करण्यात आला असून, पीसीएमसीमध्ये अशा प्रकारचा दागिन्यांचा अनुभव पहिल्यांदाच उपलब्ध होत आहे.
दोन पिढ्यांचा भावनिक बंध
चार दशकांपासून सत्यम ज्वेलर्सने ग्राहकांशी केवळ व्यावसायिक नातं नाही, तर एक भावनिक बंध तयार केला आहे. आईने खरेदी केलेल्या दागिन्यांपासून ते तिच्या मुलीच्या लग्नासाठी निवडलेल्या ब्राइडल कलेक्शनपर्यंतचा हा प्रवास — परंपरेचा आणि आठवणींचा आहे.
विशेष दागिन्यांची सादरीकरण
नवीन दालनात राजवाडी, पोल्की, अॅटिक आणि टेम्पल ज्वेलरीसह हलकी फुलकी फ्यूजन, डायमंड आणि ऑफिस वियर दागिने उपलब्ध आहेत. तसेच Satyam Silver या खास विभागात पूजावस्तू व भेटवस्तूंची खास रेंज पाहायला मिळते.
उद्घाटनाच्या खास ऑफर्स
२० व २१ एप्रिलला भव्य उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत:
• सोन्याच्या घडणावळीवर थेट २०% सूट
• हिऱ्यांच्या घडणावळीवर थेट ५०% सूट
• ‘जितकं सोनं, तितकी चांदी’ – सोनं खरेदी करताना तेवढ्याच वजनाची चांदी मोफत!
या ऑफर्स सर्व शोरूम्स (निगडी, कृष्णानगर, चाकण) मध्ये ५ मे २०२५ पर्यंत वैध राहतील.
दागिने फक्त शोभेचे नाहीत, ते आठवणींचं रूप असतात
सत्यम ज्वेलर्सचा नवीन प्रवास म्हणजे ग्राहकाला केवळ दागिने देणं नव्हे, तर त्या क्षणांना अमर करणं आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक खास प्रसंग, प्रत्येक नातं आणि प्रत्येक भावना – आता दागिन्यांच्या रूपात जपली जाईल.