Friday, April 12, 2024
Homeमहाराष्ट्रदिवस मांगल्याचे … सुवर्णखरेदीचे … सोने खरेदीसाठी सत्यम ज्वेलर्सची खास ऑफर

दिवस मांगल्याचे … सुवर्णखरेदीचे … सोने खरेदीसाठी सत्यम ज्वेलर्सची खास ऑफर

नवरात्रीनंतर काही दिवसांतच आपल्याला वेध लागतात ते आपल्या सगळ्यात आवडीच्या सणाचे – म्हणजेच दिवाळीचे. दीपोत्सव हा भारतात सगळीकडे साजरा केला जातो. अर्थात दीपोत्सव म्हणजेच, या दिवशी घरात पुढचे पाच दिवस दिवे लावले जातात, घरात सुशोभित रांगोळी काढली जाते. आकाशकंदील लावला जातो. फराळांची लगबग सुरु असते तसेच फटाकेही फोडले जातात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या सणांत दागिन्यांची खरेदी केली जाते.
लोक वर्षभर आपल्या नोकरी आणि उद्योग-धंद्यामध्ये कष्टाने कमाई करतात आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास रहावा यासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात.

दिवाळीची सुरुवात कधीपासून… ?

दिवाळी हा सण दरवर्षी पाच दिवसांचा असतो. यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे मुख्य दिवस साजरे केले जातात. यामध्ये वसुबारसपासून म्हणजेच ९ नोव्हेंबर पासून दिवाळीची सुरुवात होणार आहे. १० तारखेला धनत्रयोदशी, १२ तारखेला लक्ष्मीपूजन, १४ तारखेला दिवाळी पाडवा आणि १५ तारखेला भाऊबीज आहे.

दिवाळी सुरू झाल्यानंतर तिसर्या दिवशी लक्ष्मी पूजन असते, हा दिवस म्हणजे दिवाळी सणाचा मुख्य दिवस असतो. या दिवशी देवी लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. लक्ष्मी मातेला सर्वांचे आरोग्य आणि धनसंपदेसाठी प्रार्थना केली जाते.

धनत्रयोदशीही दिवाळीचा महत्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. धनत्रयोदशीला धनतेरस देखील म्हणतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 13 व्या दिवशी धनत्रयोदशी साजरी करतात. पाच दिवसांच्या दिवाळीची या दिवशी सुरुवात होते. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी जयंतीही असते.

धनत्रयोदशी हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात. यावेळी भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. धनत्रयोदशी संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. म्हणूनच हा दिवस सोने, चांदी आणि भांडी खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो.

यानिमित्ताने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. भारतात सोने-चांदी खरेदीसाठी धनत्रयोदशीचा दिवस नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. सराफी कट्टा या दिवशी गजबजून जातो.

निगडी येथील लोकांच्या मनातील ज्वेलरी ब्रँड म्हणजेच सत्यम ज्वेलर्स. नवरात्रीपासूनच ग्राहक सत्यम ज्वेलर्समध्ये खरेदी करण्यास गर्दी करतात. सोने, चांदी, हिरे, मोती, टेम्पल ज्वेलरी, पारंपरिक आणि आधुनिक स्मार्ट ज्वेलरीच्या असंख्य विविधतेमुळे आणि अप्रतिम कारागिरीसाठी सत्यम ज्वेलर्स ग्राहकांच्या घराघरात-मनामनात पोहचला आहे. ग्राहकांना सोने खरेदीचा आनंद घेता यावा यासाठी सत्यम ज्वेलर्स प्रत्येक दिवाळीला ग्राहकांसाठी खास खरेदीची पर्वणीच घेऊन येत असते.

ग्राहकांचा उत्सवाचा उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी सत्यम ज्वेलर्स सादर करीत आहेत एक धमाकेदार ऑफर – सोन्याच्या दागिने खरेदीवर दुप्पट वजनाची चांदी चक्क मोफत ! (*नियम व अटी लागू) ह्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सत्यम ज्वेलर्स आपणां सर्वांना आमंत्रित करीत आहेत. हि ऑफर सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, चाकण आणि कृष्णानगर शाखांमध्ये उपलब्ध आहे.

गेली ४० वर्षे सत्यम ज्वेलर्सला आपली सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सत्यम ज्वेलर्स आपल्या असंख्य ग्राहकांचे आभार आणि अभिनंदन करीत आहे ! लवकरच सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, चाकण आणि कृष्णानगर शाखांना भेट द्या आणि आनंद घ्या ” सोन्याच्या दागिने खरेदीवर दुप्पट वजनाची चांदी चक्क मोफत ” !

तसेच आम्हांस आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की, पिंपरी-चिंचवड मधील सगळ्यात भव्य चांदीचे दालन सत्यम ज्वेलर्स लवकरच आपल्या सेवेत घेऊन येत आहे. तर वाट कशाची बघताय या, खरेदी करा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करा !

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments