Saturday, September 30, 2023
Homeअर्थविश्वव्यवसाय आणि समाजसेवेची योग्य सांगड घालणारा ध्येय वेडे समाज सेवक - संतोष...

व्यवसाय आणि समाजसेवेची योग्य सांगड घालणारा ध्येय वेडे समाज सेवक – संतोष बारणे यांचा ” पिंपरी चिंचवड सन्मान ” पुरस्काराने होणार सन्मान..!

पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्राच्या विविध भागातून कामगार वर्ग स्थिरावत असून प्रत्येकाचे एक स्वप्न असतं कि स्वतःचे एक घर असावे याला अनुसरूनच मध्यवर्गियांची गरज ओळखून सिल्वर ग्रुपने सर्वांना परवडतील अशा अल्प दरात सर्व सुखसुयीनेयुक्त अशी आधुनिक घर उपलब्ध करून दिली यामुळे अल्पवधीत पिंपरी चिंचवडकरांच्या घराचे स्वप्न साकारणारी व्यावसायिक कंपनी म्हणून सिल्वर ग्रुप उदयास येत आहे, सिल्वर ग्रुप चे संचालक मा. श्री. संतोष बारणे यांचे अथक प्रयत्न आणि पारदर्शीपणा दिसून येतो. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात येथील भुमिपूत्रांसह उद्योग, व्यवसाय आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या नागरीकांचे उल्लेखनीय योगदान आहे. मा. श्री. संतोष बारणे यांच्या व्यवसायिक तथा सामाजिक कार्याची दखल घेऊन न्यूज १४ मीडिया नेटवर्क च्या वतीने देण्यात येणारा ” पिंपरी चिंचवड सन्मान ” हा पुरस्कार संतोष बारणे यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी (दि. ७ एप्रिल २०२२) रोजी सायंकाळी ५ वाजता ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

आपल्याला या समाजाला नवी दिशा देण्यासाठी कुणीच पुढे येत नाही का..? तर नाही, अशा सर्व परिस्थितीतही समाजासाठी अहोरात्र झटणारे काही आशेचे किरण मानवता धर्माची परंपरा आजही अखंडपणे जोपासत आहेत. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहारामध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मोशी गावातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संतोष सिताराम बारणे हे यापैकीच एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्व.

अत्यंत खडतर प्रवास करत संतोष बारणे यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणून नवललौकिक मिळवत असतानाच त्यांनी आपली समाजप्रती असणारी जबाबदारी पूर्णपणे पार पडली आहे. समाजातील विविध घटकांच्या भळभळणाऱ्या जखमांवर फुंकर घालून त्यांना आधार देण्याचे काम संतोष बारणे यांनी केले आहे. बांधकाम क्षेत्रातील सर्वात विश्वसनीय ब्रँड म्ह्णून संतोष बारणे यांच्या सिल्वर ग्रुप चे नाव आवर्जून घेतले जाते. प्रामाणिकपणे अथक प्रयत्न केले तर परमेश्वर आपल्या झोळीत अपेक्षेपेक्षाही जास्त टाकतो आणि त्याच झोळीतून गोरगरिबांना गरजूंना अनाथांना मदत करणे म्हणजे परमेश्वराची आपण करत असेलेली सेवाच ठरते असे संतोष बारणे मानतात.

संतोष बारणे यांनी आजवर पुणे, मुंबई, बुलढाणा तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेकडो गोरगरिबांना थेट मदत केली आहे. ग्रामीण भागातील खेडोपाड्यात जाऊन त्यांनी तिथल्या गोरगरिबांना जीवनावश्यक सर्व गोष्टींची मदत केली आहे. सर्व जाती-धर्मांचा आदर करत ते धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सढळ हाताने मदत करत असतात. समाजातील अनेक अनाथ, गरजू मुलांना त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर काम दिले आहे. त्यांच्या राहण्या-खाण्यापासून लग्न-संसारापर्यंतचा सर्व खर्च बारणे स्वतः करतात. आयुष्याला कंटाळलेल्या, खचून गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी नोकरी-व्यवसायात उभे केले आहे. शेकडो अनाथ मुलांचे पालकत्व घेऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी संतोष बारणे प्रयत्न करत आहेत. आपले या जगात कोणीही नाही, ही भावनाच या मुलांच्या मनामधून संतोष बारणे यांच्या प्रयत्नांमुळे नाहीशी झाली आहे. अशा निराधार मुलांसाठी संतोष बारणे खरे खुरे देवमाणूस ठरतात. कुणालाही वैद्यकीय मदत हवी असो किंवा शैक्षणिक अडचण असो अशा परिस्थितीत संतोष बारणे साक्षात विठ्ठलाप्रमाणे त्यांच्या सोबत ठामपणे उभे राहतात. दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या शेकडो लहान मुलांना, तरुणांना, ज्येष्ठाना व महिला भगिनींना संतोष बारणे यांनी वैद्यकीय मदत केली आहे. लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया व औषधोपचार त्यांनी स्वखर्चाने पार पडले आहेत. शेकडो उध्वस्त संसार त्यांनी पुन्हा नव्याने उभे केले आहेत. कित्येकांचे निस्वार्थ भावनेने काम करत असल्यामुळे त्यांना या त्यांच्या ईश्वरी कार्यात अनेकांची मदत मिळते.

संतोष बारणे यांनी कर्तव्यम सोशल फाउंडेशन ची स्थापना करून त्या माध्यमातून महाराष्ट्रभरात आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. रक्तदान शिबिर, लसीकरण मोहीम, रुग्णवाहिका लोकार्पण, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, महिला भगिनींचा सन्मान, वैद्यकीय मदत, वृक्षारोपण व संवर्धन स्वच्छता अभियान, अनाथ मुलांना धान्य वाटप, पोलिसांची आरोग्य तपासणी असे विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत. कोरोना प्रदूर्भावाच्या काळात काळात रक्तदान, प्लाझ्मा दान शिबिरे, आरोग्य शिबिरे, आदिवासी भागात धान्य वाटप, जनावरांच्या चाऱ्याची सोय, तृतीयपंथी लोकांना धान्यवाटप, मजूर महिलांना विनामूल्य सॅनिटरी पॅडचे वाटप अशा अनेक लोकोपयोगी कार्य त्यांनी केली आहेत. मानवता धर्माचे पालन करत समाजातील वंचित घटकांसाठी निःस्वार्थीपणे काम करण्याचे बारणे हे सातत्याने प्रयत्न करीत असतात. राज्यातील ग्रामीण भागांतील गरीब लोकांना व महिलांना मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठीचे संपूर्ण दायित्व त्यांनी स्वीकारले आहे. यापूर्वी त्यांनी या प्रकारे गरजू रुग्णांना मदत केली आहे. यापुढेही महाराष्ट्रभरात कुणालाही कोणत्याही अडचणीमुळे वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू देणार नसल्याचे संतोष बारणे सांगतात. येत्या काळात आरोग्य, क्रीडा, व सामाजिक क्षेत्रांमध्ये आणखी लोकोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचेही ते आवर्जून सांगतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments