Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीचिखली येथिल नमो संवादात मेळाव्यात संकल्प,भोसरीतून शिवाजीराव आढळराव पाटीलानां मताधिक्य देणार 

चिखली येथिल नमो संवादात मेळाव्यात संकल्प,भोसरीतून शिवाजीराव आढळराव पाटीलानां मताधिक्य देणार 

भोसरी दौरा दरम्यान चिखली येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो संवाद सभेला उपस्थित होतो. प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती प्रियाताई लक्ष्मीकांत बेर्डे यांची उपस्थिती लाभली होती. गाथा काँलनी, अभंग विश्व फेज सोसायटी, मिरर आरकेट, गव्हारे आंगण, ग्लोरिया, साई मांगल्य, हरि प्रिया हाईट्स येथिल सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नमो संवाद संकल्पना ही गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या महत्त्वपूर्ण योजना राबवली गेल्या याचा ऊहापोह मांडण्यासाठी  सुरू केला आहे. आणि या उपक्रमाला जनतेकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. आमदार महेश लांडगे यांनी दहा वर्षात केलेली कामे दमदार ठरली. नरेंद्र मोदी यांच्याशी फार जवळून काम करण्याची मला संधी मिळाली. दरम्यान मी अनुभवलं 2014 अगोदरचा आपला देश आणि त्यानंतरचा आपला देश यात फार फरक आता आपल्याला दिसत आहे. असे शिवाजी आढळराव पाटील म्हणाले. 

370 चा निर्णय असेल, तितका धाडसी निर्णय घेण्याची क्षमता कुठल्याच नेत्यांमध्ये नसेल. आत्ताच्या योजना हे जनतेमधील सर्वसामान्य पर्यंत पोहोचणारे आहेत. 13 लाख 38 हजार घरांमध्ये पाणी पोहोचवलं आहे शिरूर मतदारसंघात नळाच्या माध्यमातून. मोदीजींना अमलात आणलेल्या पीएम किसान योजना शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यांमध्ये पैसे जातात  पुढील पाच वर्षातही या योजना लागू राहणार आहे. अशा योजना लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

याप्रसंगी  जिल्हा नियोजन समिती सदस्य विजू फुके, शिवसेना उपनेतेे इरफान सय्यद, समन्वयक महायुती भोसरी दत्तात्रय भालेराव, नगरसेवक अंकुश मळेकर, नगरसेवक संतोष मोरे, माजी नगरसेवक सुरेश तात्या मैत्रे, भाजप उपाध्यक्ष किसन शेठ बावरकर, भाजप महिला पिंपरी चिंचवड सरचिटणीस सोनम ताई मोरे, समाजसेवक अंकुश माळेकर, युवा नेते विनायक आबा मोरे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments