Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रसत्यम ज्वेलर्स तर्फे “ संकल्प “ मंगल क्षणांना समृद्ध करण्याचा ! 

सत्यम ज्वेलर्स तर्फे “ संकल्प “ मंगल क्षणांना समृद्ध करण्याचा ! 

विवाह हा संस्कार सोळा संस्कारातील एक पवित्र संस्कार आहे. त्यामधे दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. या सोहळ्यात धार्मिक विधीबरोबर इतर सर्व विषयांचा सुंदर मिलाप झालेला असतो. या सोहळ्यात वधूवरांची सलगी वाढण्यासाठी त्यामधे अप्रतिम रचनाच अशी केली आहे. उष्टी हळद लावणे, सूत्रवेष्टन, सुवर्णाभिषेक असे अनेक विषय यामधे आहेत. या संस्कारामध्ये वडिलधार्‍या मंडळींचा योग्य सन्मान केला जातो. वधूपक्ष व वरपक्ष हे एकमेकांचे आदरसत्कार करतात. त्यानंतर अंतरपाट हा काहीवेळेसाठी आलेल्या विरहाचे प्रितीत रुपांतर करतो. या संस्कारामध्ये वधू व वर दोघेही देव, अग्नी पुरोहित यांच्यासमोर एकमेकांशी कायम एकनिष्ठ राहण्याचे वचन देतात. तसेच सप्तपदीच्यावेळी दोघेही एकत्र सात पाऊले चालून नाते आणखी दृढ करतात.

ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये संकल्प सोहळ्याचे महत्व अनन्य साधारण आहे. संकल्प सोहळा म्हणजे लग्नाच्या दिवशीच लग्नाची घोषणा. पूर्वीच्या काळी हा कार्यक्रम लग्नाच्या एक दिवस आधी केला जायचा पण आजकाल संकल्प सोहळा लग्नाच्या दिवशीच केला जातो हा नवा बदल आहे. भगवान गणेश सर्व अडचणी किंवा अडथळे दूर करतात म्हणून गणेश पूजा देखील केली जाते आणि भगवान गणेशाच्या आशीर्वादाशिवाय हा सोहळा अपूर्ण आहे.

उंबरठ्याचे माप ओलांडुन प्रवेश करणार्‍या गृहलक्ष्मीच्या आगमनाने सर्व कुटुंब आनंदी होते. या संस्कारामध्ये त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली जाते. आलेल्या गुरूजींबरोबर पाहुणे मंडळी त्या उभयतांना भरभरून आशीर्वाद देतात.

यंदाची लग्नसराई सत्यम ज्वेलर्सने “संकल्प सोहळ्याची” मध्यवर्ती संकल्पना घेऊन “संकल्प” नावाने वेडिंग ज्वेलरी कलेक्शन ग्राहकांच्या भेटीस घेऊन येत आहे.

लग्नसराई म्हणजे खरेदीची धामधुम. वधू-वरांच्या कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत दोन्ही कुटुंबे अगदी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटतात.

सत्यम ज्वेलर्स नेहमीच आपल्या ग्राहकांना खरेदीचा आनंद घेता यावा म्हणून जय्यत तयारी करत असतात. यंदाही लग्नसराई निमित्ताने सत्यम ज्वेलर्सने टेम्पल, पोल्की, अँटिक, कुंदन ज्वेलरीपासून ते डायमंड ज्वेलरी पर्यंतची अगणित व्हरायटी आणि कारागिरी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

सत्यम ज्वेलर्स दागिन्यांच्या अप्रतिम कारागिरीसाठी आणि असंख्य विविधतेसाठी निगडी, पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरात नावाजलेली सुवर्ण पेढी आहे म्हणून ग्राहकांची दागिन्यांप्रती प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणे सत्यम ज्वेलर्स आपले कर्तव्य मानते.

लग्नसराईमध्ये वधूू-वराला उपयुक्त असणाऱ्या चांदीच्या दागिन्यांचीही असंख्य उपलब्धता सत्यम ज्वेलर्सने आपल्या ग्राहकांसाठी आपल्या “सत्यम सिल्वर” ह्या पिंपरी चिंचवड मधील सर्वात मोठ्या म्हणजेच ५००० स्क्वे. फु. च्या दालनात करून दिली आहे.

चांदीच्या दागिन्यांपासून ते चांदीची विविध भांडी, लग्नात दिल्या जाणाऱ्या आणि कॉर्पोरेट भेटवस्तुंची रेलचेल आपणांस “सत्यम सिल्वर” मध्ये पहावयास मिळते.

गेली ४० वर्षे सत्यम ज्वेलर्सला आपली सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सत्यम ज्वेलर्स आपल्या असंख्य ग्राहकांप्रती आभार व्यक्त करीत आहे.

तर आता वाट कशाची बघताय ? लवकरच सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, चाकण आणि कृष्णानगर शाखांना भेट द्या आणि लग्नसराईच्या खरेदीचा आनंद घ्या !

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments