Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचा संजीवन समाधी सोहळा, ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करीत...

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचा संजीवन समाधी सोहळा, ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करीत भाविक भक्तिरसात चिंब

श्री विठ्ठल , ज्ञानोबा माऊली, तुकाराम नामजय घोषात श्रींचा रथोत्सव

आज श्रींचा संजीवन समाधी दिन सोहळा , विना, टाळ, मृदंगाचा त्रिनादासह माऊली, माऊली, श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम नामजयघोष करीत बुधवारी ( दि. २७ ) भाविक, वारकरी यांच्या उपस्थितीत द्वादशी दिनी माउलींचा वैभवी पुरातन सिसम लाकडी रथ या रथातून श्रींचा चांदीचा मुखवटा रथोत्सवासाठी पूजा बांधीत रथोत्सव हरिनाम गजरात प्रथापरंपरांचे पालन करीत उत्साहात साजरा झाला. रथोत्सव मिरवणूक, ग्रामप्रदक्षिणा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली, तुकाराम हरी नामजयघोष भाविकांनी केला. भाविकांचे नामजय घोषात यावर्षी पुरातन रथ विद्युत रोषणाई आणि सुगंधित अत्तराने मढविलेला सजलेल्या रथात माऊलींची पूजा बांधीत रथोत्सव गोपाळपुरातून नगरप्रदक्षिणा मार्गे श्रींचे मंदिरा समोर आला.

रथोत्सव प्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गौर, माजी नगराध्यक्ष मानकरी राहुल चिताळकर, योगेश सुरू, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब कुऱ्हाडे पाटील, स्वप्नील कुऱ्हाडे, संतोष मोझे, श्रींचे पुजारी, केसरी महाराज, मुक्ताई संस्थान अध्यक्ष रवींद्र भय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, श्रींचे पुजारी अमोल गांधी, अवधूत गांधी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ.भा lवार्थ देखणे, संत तुकाराम महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, व्यवस्थापक माऊली वीर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, स्वामी सुभाष महाराज, माऊली निंबाळकर, अरुण बडगुजर, अजित घुंडरे पाटील सोहळ्यातील विविध दिंडी प्रमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख, महाराज मान्यवर, वारकरी, भाविक, आळंदीकर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. रथोत्सवापूर्वी आळंदीकर ग्रामस्थांनी श्रींची पालखी खांद्यावर घेत गोपाळपूर पर्यंत हरिनाम गजरात आणली.

रथोत्सवास हजारो भाविक नागरिकांनी जय घोष केला. भाविक भक्तिमय वातावरणात चिंब झाले. वारकरी तसेच रथोत्सवाचे रस्त्याचे दुतर्फा श्रींचे दर्शनास ग्रामस्थांनी, भाविकांनी गर्दी केली. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात होता. उद्या गुरुवारी ( दि.२८ ) श्रींचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा अलंकापुरीत साजरा होत आहे. दरम्यान द्वादशी दिनी सोहळ्यात भाविक, नागरिकांची तसेच व्यापा-यांची लक्षणीय उपस्थिती होती. आर्थिक पेचात असलेल्या व्यापार्‍यांना या वारीने काहीसा दिलासा दिला. भाविक, वारकरी यांनी यात्रेतील खरेदी करण्यास दुकानांतून गर्दी करीत आवश्यक खरेदीचा आनंद देखील द्वादशी दिनी घेतला.

दरम्यान ज्ञानभक्ती चैतन्यमयी वातावरण रथोत्सवात ग्रामप्रदक्षिणा मिरवणूकींने नगरप्रदक्षिणा कार्तिकी वारीत झाली. यावेळी रस्त्यांचे दुतर्फा उभे राहून श्रींचे रथोत्सवात ग्रामस्थ व भाविकांनी दर्शन घेत स्वागत केले. 

गोपाळपुरातील श्री राधाकृष्ण मंदिरात परंपरेने इनामदार कुटुंबीयांच्या वतीने श्रींची विधिवत पूजा, आरती झाली. तत्पूर्वी श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मठ यांचे वतीने अवधूत गांधी , सुधीर गांधी, माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी परिवाराचे तर्फे रथोत्सवाचे स्वागत करण्यात आले.

रथोत्सवास पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील , व्यवस्थापक माऊली वीर, श्रीचे सेवक दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी, क्षेत्रोपाध्ये विवेक इनामदार परिवार, बाळासाहेब रणदिवे चोपदार, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे , योगेश आरु, अनिल कु-हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, श्रींचे मानकरी, देवस्थांनचे कर्मचारी, भाविक, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. परिसरातून भाविक, वारकरी, दिंडीकरी श्रींचे रथोत्सवात सहभागी झाले. माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, आळंदी ध्वंसेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, एन के टी ट्रस्ट ठाणेवाला आळंदी प्रमुख मनोहर दिवाने, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके आदींचे वतीने रथोत्सवाचे स्वागत करण्यात आले.


गोपाळपुरात श्रींची पूजा होताच माउलींचा चांदीचा मुखवटा ग्रामप्रदक्षिणेसाठी यावर्षी सजलेल्या पुरातन लाकडी पूजा बांधीत विराजमान करण्यात आला. दरम्यान श्रींचे रथोत्सवास रथासमोर श्रीकृष्ण मंदिरासमोर भाविक वारकऱ्यांचे दिंडीतुन भगव्या पताका उंचावत माउली माउली‘चा गजर करत रथोत्सव सुरु झाला. ग्रामप्रदक्षिणा चाकण चौक, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिणी चौक मार्गे, जुना नगरपरिषद चौक मार्गे माऊली मंदिर या मार्गावरून रथोत्सव हरिनाम गजरात प्रदक्षिणा झाली. मंदिरा समोरील महाद्वारात आल्यावर रथोत्सवाची सांगता झाली. मंदिरात प्रदक्षिणा, धुपारती झाली. दरम्यान विना मंडपात हरिभाऊ बडवे ,केंदूरकर महाराज यांचे वतीने परंपरेने कीर्तन सेवा झाली. कीर्तन नंतर श्रींचे गाभाऱ्यात निमंत्रित यांना खिरापत प्रसाद वाटप, विना मंडपात, फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसादाचे वाटप परंपरेने झाले. मंदिरात श्रींचे संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधी तज्ज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर आदींचे नियंत्रणात उत्साहात झाला. यावेळी आळंदी ग्रामस्थ, मानकरी, भाविक, दिंडीकरी यांचेसह श्रीधर सरनाईक आदीं आदी उपस्थित होते. मंदिरात कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुखकर तसेच समाधानकारक दर्शनाची व्यवस्था देवस्थान तर्फे करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.

आज श्रींचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा कार्तिकी यात्रा २०२४ अंतर्गत श्रींचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परंपरांचे पालन करीत गुरुवारी ( दि.२८ ) अलंकापुरी नगरीत साजरा होत आहे. या निमित्त श्रींचे संजीवन समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा संत नामदेवराय यांचे वंशज परिवारा तर्फे होणार आहे. तत्पूर्वी माउली मंदिरात प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांचे हस्ते श्रीना पवमान अभिषेक व दुधारती होईल. संत नामदेवराय यांचे वतीने श्रीना नामदास महाराज परिवाराचे वतीने पूजा होईल. परंपरेने विना मंडप, भोजलिंगकाका मंडप,हैबतरावबाबा पायरीपुढे परंपरेने कीर्तन सेवा रुजू होईल. सकाळी दहा वाजता नामदास महाराज यांचे परंपरेने श्रींचे संजीवन समाधी सोहळ्या तील कीर्तन होणार आहे. दरम्यान महाद्वारात काल्याचे कीर्तन त्यानंतर श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल. दुपारी बाराचे सुमारास श्रींचे संजीवन समाधीवर पुष्पवर्षा, आरती व घंटानाद होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांना नारळ प्रसाद वाटप व महानैवेद्याने भाविकांना दर्शन सुरू होईल. सोपानकाका देहूकर यांचे वतीने विना मंडपात कीर्तन त्यानंतर हैबतरावबाबा यांचे वतीने हरिजागर होणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments