१८ डिसेबंर शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी संजय यादव यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना वाहतूक सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष उदय दळवी आणि पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी यांनी या निवडीबाबतचे पत्र दिले आहे.
संजय यादव हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. पक्षवाढीसाठी त्यांनी सामाजिक, शेक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबिवले आहेत त्यांच्या या निवडीमुळे परिसरातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.