Sunday, December 3, 2023
Homeताजी बातमीराजकीय भूकंपानंतर संजय राऊतांचं ट्विट … म्हणाले "हे खेळ फार काळ सहन...

राजकीय भूकंपानंतर संजय राऊतांचं ट्विट … म्हणाले “हे खेळ फार काळ सहन करणार नाही”..

अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यातच आता शिवसेना नेते संज राऊत यांनी ट्वीट करत आमदारांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षाला आणि मविआ सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीत फुट पडणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते मात्र आता राष्ट्रावादीत फुट पडली आहे. अजित पवारांसोबत 30 आमदारांचा पाठिंबा आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमदारांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी ट्वीट करत दिली आहे.

संजय राऊतांनी ट्विटमध्ये काय लिहिलंय?

“महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, ‘मी खंबीर आहे. लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.’. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.”, असं राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवार हे खंबीर असल्याचं ते महाराष्ट्रातील राजकारण्यांना आणि जनतेला भासवत आहे. जनता हा खेळ फार काळ सहन करणार नसल्याचंदेखील त्यांनी ट्विटमार्फत सांगितलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments