Tuesday, February 27, 2024
Homeताजी बातमीतुरुंगातील कोठडी सॅनिटाईझ करतायत, बाप बेटे जेल मधे जाणार; संजय राऊत यांचं...

तुरुंगातील कोठडी सॅनिटाईझ करतायत, बाप बेटे जेल मधे जाणार; संजय राऊत यांचं नवं ट्विट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या वादळी पत्रकारपरिषदेनंतर पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी एक नवं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र! त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर काही कारवाई होणार का, हे पाहावे लागेल. किरीट सोमय्या यांचे पीएमसी घोटाळ्यातील आरोपीशी संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या सगळ्याची कागदपत्रे आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) देणार असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेकडून किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरुद्ध तपासाची चक्रे फिरायला सुरुवात होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या संजय राऊत यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर सातत्याने आरोप करत होते. मात्र, मंगळवारी शिवसेना भवनात संजय राऊत यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. इतके दिवस इतरांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनाच राऊतांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यामुळे आता किरीट सोमय्या या सगळ्यावर काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल. किरीट सोमय्या हे थोड्याचवेळात पत्रकारपरिषद घेणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments