Sunday, February 15, 2026
Homeगुन्हेगारीधक्कादायक! सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना सदस्याची हत्या, राष्ट्रवादीचे दोघे गंभीर

धक्कादायक! सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना सदस्याची हत्या, राष्ट्रवादीचे दोघे गंभीर

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवरुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोरगाव गावात उपसरपंच निवडीवरून एका ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. पांडुरंग काळे असं मृत ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे. बोरगावमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

बोरगाव गावातील पांडुरंग काळे (वय 55) या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. पांडुरंग काळे हे शिवसेना पक्षाचे सदस्य होते अशी प्राथमिक माहिती आहे.

पांडुरंग काळे यांचा खून झाला असून या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या घटनेप्रकरणी चौकशीला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments