Saturday, December 9, 2023
Homeगुन्हेगारीसमृद्धी महामार्गा अपघात : पिंपरी- चिंचवडमधील मायलेकीसह सासूसाठी ठरला हा शेवटचा प्रवास

समृद्धी महामार्गा अपघात : पिंपरी- चिंचवडमधील मायलेकीसह सासूसाठी ठरला हा शेवटचा प्रवास

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात होरपळून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंपरी- चिंचवडमधील मायलेकीसह सासूचा समावेश आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात होरपळून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंपरी- चिंचवडमधील मायलेकीसह सासूचा समावेश आहे. वनकर कुटुंब हे शहरातील पिंपळे सौदागर भागात राहते. संगणक अभियंते असलेले प्रणित वनकर यांच्या आई, दोन वर्षीय मुलगी आणि पत्नी काही दिवसांपूर्वी लग्न समारंभासाठी नागपूरला गेल्या होत्या. ते नागपूरहून ट्रॅव्हल्स ने परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. शोभा वनकर, वृषाली वनकर आणि ओवी वनकर अशी या तिघींची नावे आहेत. या दुःखद घटनेमुळे पिंपळे सौदागर परिसरात शोककळा पसरली आहे.

नागपूरवरून निघालेल्या ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात होरपळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की मृतांची ओळख पटविणे देखील कठीण झालेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची नोंद घेऊन मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेत नातेवाईकांचे सांत्वन केले.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील ट्रॅव्हल्समध्ये पिंपरी- चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथे राहात असलेल्या वनकर कुटुंबातील दोन महिला आणि एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. प्रणित वनकर हे संगणक अभियंते असून त्यांची आई, दोन वर्षीय मुलगी आणि पत्नी या नागपूर येथे लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. प्रणित वनकर देखील गेले होते. परंतु, ते गेल्या आठवड्यातच पुण्यात परत आले आणि आई, मुलगी आणि पत्नी ट्रॅव्हल्सने येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरावरती शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments