कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं भाजप नेते समरजित घाटगे नाराज झाले आहेत.
कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं भाजप नेते समरजित घाटगे नाराज झाले असल्याची माहिती मिळत आहे. समरजित घाटगे हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक आहेत. मात्र आता हसन मुश्रीफ यांचाच मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यामुळे घाटगे भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या नेत्यांमध्ये हसन मुश्रीफ यांचा देखील समावेश आहे. मात्र हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद देण्यात आल्यानं आता समरजित घाटगे नाराज असल्याचं समोर आलं आहे. समरजित घाटगे हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे घाटगे हे नाराज आहेत, ते भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये असून, ते भाजप देखील सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पटेलांचा खळबजनक दावा
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी भाजपसोबत युती करणार होती. भाजपसोबत युती करण्यासाठी 51 आमदारांनी शरद पवार यांना पत्र दिलं होतं. एकनाथ शिंदे गुवाहाटीला असताना हे पत्र देण्यात आलं होतं, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.