Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमीWest Bengal Election 2021 : अखिलेश यादवांचे ममता बॅनर्जींना समर्थन; तेजस्वी यादवांनीही...

West Bengal Election 2021 : अखिलेश यादवांचे ममता बॅनर्जींना समर्थन; तेजस्वी यादवांनीही दिला आहे पाठिंबा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी आता बिहारचे नेतेही पश्चिम बंगालमध्ये आपला पाठिंबा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना देत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांना समर्थन जाहीर केलं आहे.

रायझिंग यूपी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलताना अखिलेश यादव यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना समर्थन जाहीर केलं आहे. अखिलेश यादव म्हणाले की, त्यांचा पक्ष पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना समर्थन देत आहे. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरणमय नंदा आणि पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करतील, अशी घोषणाही अखिलेश यादव यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणं झालं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय हा समाजवादी पक्षाचा विजय असेल. पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजप आणि त्यांचे काही सहकारी पक्ष लपून आहेत. निवडणूक संपताच भाजपचे लपून बसलेले सहकारी पक्ष उत्तर प्रदेशात येतील. मात्र, आता उत्तर प्रदेशातील जनता त्यांना धडा शिकवण्यास तयार आहे, असा टोलाही अखिलेश यांनी यावेळी लगावला आहे.

ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांनी आक्रमक प्रचार सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेत्यांनी पश्चिम बंगालकडे आपला मोर्चा वळवला आहे. 1 मार्च रोजी तेजस्वी यादव यांनी आज तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. “ममता बॅनर्जी यांना पूर्ण पाठिंबा देण्याचा लालू यादव यांचा निर्णय आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येण्यापासून भाजपला रोखणं हे आमचं पहिलं लक्ष्य आहे”, असं तेजस्वी यादव म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments