पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस तसेच निगडी येथील पुर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमास माजी नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेविका सुमन नेटके, अनुराधा गोरखे, कमल घोलप, उपआयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक ,जेष्ठ नेते प्रल्हाद सुधारे, किसन नेटके, भाऊसाहेब आडगळे, संदीपान झोंबाडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष अण्णासाहेब कसबे, पदाधिकारी, नितीन घोलप, सचिन दुबळे, विठ्ठल कळसे, गणेश साठे, अक्षय उदगीरे, सोमेश्वर बावणे, यादव खिलारे, मनोज तोरडमल, नाना कसबे, भगवान शिंदे, युवराज दाखले, अरुण जोगदंड, अमित गोरखे ,सतीश भवाळ, दत्तू चव्हाण, डी. पी. खंडागळे, संजय ससाणे, अनिल सौदंडे, प्रमोद खिलारे , योगेश लोंढे , रामदास कांबळे, संतोष जोगदंड, सुरेश जोगदंड, धम्मराज साळवे, शिवाजीराव साळवे, रामभाऊ पात्रे, अण्णा लोखंडे, रवींद्र खिलारे, मनोज पवार, शंकर खुडे, शिवाजी खडसे,अनिल तांबे, अनिल गायकवाड, महादेव वैरागर, मोहन भिसे, बालाजी गवारे, विजय तावरे, संतोष इंगळे, वसंत वावरे, नाना पाटोळे, स्वप्निल वाघमारे, बाबा रसाळ, मयूर घोलप, प्रभाकर वैराळ, दीपक लोखंडे, किशोर हातागळे, अविनाश साळवे, बाजीराव मोरे, कैलास वारके, मधुकर रोकडे, गणेश अवघडे, नाना पाटोळे, शेषनारायण पवार, सामाजिक कार्यकर्त्या झुंबरताई शिंदे ,केशरताई लांडगे, मीना कांबळे, सविता आव्हाड, मीना खिलारे , कुसुम कदम, मीरा अल्लाड, रेखा दोनघे, अनिता गायकवाड, जनाबाई वैरागे, विनू ताई राजगुरू, भारती नुरी, मंगल रूपटक्के, आशाताई शहाणे आदी उपस्थित होत्या.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी अनेक कथा, कादंबऱ्या ,लोकनाट्य, पोवाडे, प्रवासवर्णन, लावण्या आणि गाणी लिहिली आहेत. अण्णा भाऊ हे मराठी साहित्याला क्रांतीचा उर्जास्त्रोत देणारे लोकशाहीर म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांनी रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करून देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या नावलौकिकात देखील भर घातली. त्यांच्या फकिरा या लोकप्रिय कादंबरीला राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.