बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा खूप साधारण आयुष्य जगतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहेत. तो 1BHK फ्लॅटमध्ये राहतो याची देखील अनेकांना कल्पना ही असेलच. पण त्याशिवाय सलमानच्या अनेक प्रॉपर्टी आहेत ज्याविषयी अनेकांना ठावूक नाही. सलमानकडे मुंबईच्या सांताक्रूज परिसरात चार माळ्याची एक बिल्डिंग आहे. सलमाननं ही जागा 2012 मध्ये जवळपास 120 कोटींसाठी घेतली होती. रिपोर्ट्सनुसार, सलमानचे वडील सलीम खान यांनी रिटेल चेन फूड हॉलसोबत या ठिकाणासाठी डिल केली होती.

सलमानच्या या डिलला पुढे जाणून किशोर बियानी यांच्या फ्यूचर ग्रुपकडून पाठिंबा मिळाला. त्यांनी त्यावेळी त्यांनी पाच वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट केला. त्यावेळी पाच वर्षांसाठी त्यांनी दर महिन्याला 80 लाख असं भाडे देण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर हे भाडं वाढून 89.60 लाख दर महिन्याचं भाडं झालं. त्यावेळी फ्यूचर ग्रुपनं त्याला 2.40 कोटींची डिपॉजिट देखील दिलं होतं. सुरुवातीचे पाच वर्षे झाल्यानंतर, या कराराला दोन वर्षासाठी वाढवण्यात आलं. तर त्यावेळी दुसऱ्या वर्षापासून महिन्याचं भाडं हे 94.01 लाख असेल असं ठरवण्यात आलं. त्यावेळी असं सांगण्यात आलं की त्यांनी भाडं न दिल्यानं सलमान खानला हा बॉन्ड तिथेच संपवायचा होता. तो नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनलला गेला आणि त्यानंतर सलमानच्या बाजूनं निर्णय निघाला.