Sunday, October 6, 2024
Homeबातम्यादिवाळीला सलमान खानचा बॉक्स ऑफिसवर धमाका, टायगर- 3 ची पहिल्याच दिवशी तगडी...

दिवाळीला सलमान खानचा बॉक्स ऑफिसवर धमाका, टायगर- 3 ची पहिल्याच दिवशी तगडी कमाई

सलमान खानच्या चाहत्यांसाठी यंंदाची दिवाळी खूपच खास असणार आहे. सलमान खानचा नवाकोरा सिनेमा ‘टायगर ३’ दिवाळीच्या मुहूर्तावर १२ नोव्हेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सलमानच्या सिनेमाला चित्रपटगृहांमध्ये नेहमी गर्दी होताना दिसते. आताही सिनेमा प्रदर्शित रीलिज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कमाई केली असावी, याचा अंदाज बांधला जातो आहे. सलमान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘टायगर ३’चे पहिल्या दिवशीच्या आकड्यांचा अंदाज निर्मात्यांना दिलासा देणारा आहे.

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये ‘टायगर’ फ्रँचायझीची सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळते. २०१२ साली ‘एक था टायगर’ आलेला, त्यानंतर २०१७ मध्ये या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात ‘टायगर जिंदा है’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी चांगली कमाई केली होती. दरम्यान प्रेक्षक तब्बल सहा वर्षांपासून सलमान खानच्या या सिनेमाच्या तिसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत होते. अखेर दिवाळीदिवशी त्यांच्या आवडत्या हिरोचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

‘टायगर ३’ ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसाची आकडेवारी बघता अखेर सलमानचा चित्रपट बघायला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक थिएटर्समध्ये गेले आहेत, असंच म्हणावं लागेल. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार टायगर ३ ने पहिल्या दिवशी ४० कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाने तब्बल ४४.५० कोटी कमावले आहेत. चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ४४.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपट दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी जवळपास २५ कोटींची कमाई करू शकतो. खरं तर हे पहिल्या दिवसाच्या तुलनेने कमी असेल, पण चित्रपट रविवारी प्रदर्शित झाल्याने सोमवारपासून आठवडा सुरु होतो, तसेच आज कोणतीही सुट्टी नाही, त्यामुळे एकूण कलेक्शनमध्ये घसरण पाहायला मिळेल. पहिल्या दिवसाची कमाई आणि दुसऱ्या दिवसाचे अंदाज पाहता चित्रपट तीन दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.

दरम्यान, ‘टायगर ३’ या चित्रपटात सलमान खान टायगरच्या भूमिकेत तर कतरिना कैफ झोयाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत नवीन चेहरा आहे. चित्रपटांमध्ये आपल्या रोमँटिक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला इमरान हाश्मीने या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्याला नव्या रुपात पाहता येणार आहे. ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ नंतर ‘टायगर ३’ येत्या काळात किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments