बॉलिवूडच्या भाईजानचा बहुप्रतिक्षीत ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. येत्या ईदला म्हणजेच मे महिन्याच्या 14 तारखेला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये धडकणार आहे.
सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे पोस्टर तुफान व्हायरल होताना दिसतंय. तर सलमानच्या चाहत्यांची उत्सुकता आता ताणली गेलीय. या पोस्टरला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय.
‘राधे’ सिनेमाच्या पोस्टरमध्ये सलमानचा दंबग अंदाज पाहायला मिळतोय. सलमान खानने हे पोस्टर शेअर करत चाहत्यांसाठी एक कॅप्शन दिलंय. ” ईदची कमिटमेन्ट दिली होती. ईदलाच येणार क्यू की एक बार जो मैने…” असं खास कॅप्शन त्यानं दिलंय. चाहत्यांना दिलेलं वचन पाळत असल्याचं त्यानं या कमेंटमधून सांगितलं आहे.