26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ सिनेमाची प्रदर्शनाआधीच चर्चा रंगू लागली आहे. याचे कारण की, यात अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांची लाडकी लेक सई मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
‘मेजर’ सिनेमातील सईचा फर्स्ट लूक समोर आला असून चाहत्यांना तिचा हा लूक चागंलाच आवडला आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यात ती शाळेच्या गणवेशात अभिनेता अदिवि शेष याच्या शेजारी बसलेली दिसतेय. यात सई अदिवकडे अत्यंत प्रेमाने पाहत असल्याचं दिसून येतयं.

‘मेजर’ सिनेमात मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि त्यांची प्रेयसी असलेल्या ईशाची प्रेम कहाणी देखील पाहायला मिळणार आहे. यात सईच्या लूकसोबतच ईशाने संदीप यांना लिहलेलं एक पत्र पाहायला मिळतंय. ईशाच्या हस्ताक्षरातील या पत्रावरच सई आणि अदिवि यांचा फोटो पाहायला मिळतोय.
या सिनेमात सई 16 वर्षाच्या मुलीपासून 28 वर्षांच्या तरुणीची भूमिका साकारणार आहे. ‘मेजर’ सिनेमा हिंदीसोबतच तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे तेलगू सिनेमातील सईच्या संवादांसाठी कोणत्याची व्हाइश ओव्हर आर्टिस्टची मदत घेण्यात आलेली नाही. तेलगू भाषेतील सर्व डायलॉग सईने स्वत: म्हंटले आहेत. ‘मेजर’ सिनेमाचा टीझर 12 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात साउथ अभिनेता अदिवि शेष मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या भूमिकेत झळकणार आहे. 2 जुलैला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.