मराठी साहित्य कला मंडळ आयोजित राजन लाखे लिखित ” गुंता ” या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते गुरूवार दिनांक २७ जानेवारी रोजी ४.३० वाजता होणार आहे.प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे भूषविणार आहेत. प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून ” गुंता” या पुस्तकावर भाष्य करणार आहेत व त्यातील विविध पैलू रसिकांना उलगडून दाखवणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे या पुस्तकातील अंतरंगावर आपले विचार मांडणार आहेत. सदर प्रकाशन सोहळा हा ऑनलाईन असून त्यांची लिंक खालील प्रमाणे आहे. http://meet.google.com/fma-gtni-edg “गुंता” हा ललित लेखसंग्रह संवेदना प्रकाशन पुणे ने प्रकाशित केला असून, सदर प्रकाशन सोहळ्यातील मान्यवरांच्या विचारांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशक नितीन हिरवे आणि लेखक राजन लाखे यांनी केले आहे.