Tuesday, February 27, 2024
Homeताजी बातमीएस. बी. पाटील स्कूलच्या भिंती बोलू लागल्या वीरांच्या यशोगाथा

एस. बी. पाटील स्कूलच्या भिंती बोलू लागल्या वीरांच्या यशोगाथा

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये भित्ती चित्राचे मेजर जनरल इंद्रजीत सिंग यांनी केले उद्‌घाटन

विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण होण्यासाठी त्यांना सैन्याबद्दल आदर, शिस्तबद्धता, गौरव गाथा सांगणे आवश्यक आहे. यासाठी एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या भिंतींवर वीरांच्या यशोगाथा सांगणारी चित्रे मार्गदर्शक ठरतील असे मत मेजर जनरल इंद्रजीत सिंग यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी (दि. ८ फेब्रुवारी) परमवीर चक्राने सन्मानित झालेल्या वीरांच्या यशोगाथा सांगणाऱ्या भित्ती चित्रांचे उद्घाटन मेजर जनरल इंद्रजीत सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. मेजर जनरल इंद्रजीत सिंग हे दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा या विभागाचे जनरल ऑफिसर ऑफ कमांडिंग आहेत.

यावेळी कर्नल कृष्णकांत, बिजय कुमार श्रीवास्तव, पीसीईटीच्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. जान्हवी इनामदार, एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, धनाजी पाटील, रोबोटिक्स शिक्षिका वर्षा गवळी, सुलोचना पवार, प्रथमेश इनामदार, अजय चावडीया, वर्षा कुलकर्णी, भारती चप्परवाल आदी उपस्थित होते. यावेळी मेजर जनरल इंद्रजीत सिंग यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांना श्रावणी सांगळे, आयुष भिसे, समृद्धी नेवगिरे, धवला पाटील, सोहा शेख, सौरिष, रुद्र खरटमल या विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले. मेजर जनरल सिंग यांनी लष्करातील सेवा काळातील विविध रोमांचक अनुभव सांगितले. तसेच पुण्यातील सीएमई, एएफएमसी, एनडीए ट्रेनिंग सेंटर तसेच आरआयएमसी देहरादून यासारख्या शिक्षण संस्था बद्दल मुलांना माहिती दिली.या सोहळ्याला उपमुख्याध्यापिका पद्मावती बंडा, शुभांगी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. स्वलेहा मुजावर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी वीरांची यशोगाथा सांगणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments