Wednesday, July 15, 2026
Homeअर्थविश्वरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा… युक्रेनमध्ये पहाटेपासून...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा… युक्रेनमध्ये पहाटेपासून स्फोटांचे आवाज

रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच मोठी घडामोड समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. पुतीन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करत असल्याचं सांगितलं असून या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज…
युक्रेनच्या राजधानीपासून ४८० किमी अंतरावर असणाऱ्या दुसरं सर्वात मोठं शहर Kharkiv मध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत. आज सकाळी युक्रेनच्या नागरिकांनी एक वेगळा देश पहायला मिळत असल्याचं CNN च्या रिपोर्टरने सांगितलं. युक्रेनमध्ये सध्या पहाटेचे ५ वाजून ५० मिनिटं झाली आहेत. भारतातील वेळ साडे तीन तासांनी पुढे आहे.

AP ने दिलेल्या वृत्तानुसार, रशिया युक्रेनमध्ये घुसखोरी करेल यावर मी विश्वास ठेवला नव्हता आणि काहीही गंभीर होणार नाही असं स्वत:लाच सांगितलं होतं. पण मी चुकीचा ठरलो आहे आणि मला पुन्हा चुकीचं ठरायला आवडेल. मला पुतिन यांना युक्रेनमध्ये निघालेलं सैन्य थांबवा असं मनापासून सांगायचं आहे. आधीच अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे असंही ते म्हणाले.

विनाशकारी परिणाम होतील, अमेरिकेचा रशियाला गर्भित इशारा
रशियाने युद्ध पुकारताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी विनाशकारी परिणाम होतील असा गर्भित इशारा दिला आहे. या हल्ल्यामुळे होणारी हानी आणि मृत्यू यासाठी रशिया एकटी जबाबदार असेल असंही ते म्हणाले आहेत. तसंच अमेरिका आपल्या सहकारी देशांसह याचं उत्तर देईल असंही म्हणाले आहेत. जग रशियाला जबाबदार धरेल असंही त्यांनी सांगितलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments