Wednesday, July 15, 2026
Homeआंतरराष्ट्रीयरशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले, खारकीव आणि क्यीव शहराला केले टार्गेट….

रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले, खारकीव आणि क्यीव शहराला केले टार्गेट….

रशिया-युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस आहे. चर्चेच्या फैरीनंतरही युक्रेनवरील हल्ले थांबलेले नाहीत. उलट आज सातव्या दिवशी रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये आतापर्यंत १३ बालकांसह कमीत कमी १३६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक सैनिकांचाही मृत्यू झाला असून शेकडो सैनिक जखमी झाले आहे. रशियातील हल्ल्यात घरे आणि इमारती उद्ध्वस्त झाल्या असून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. लोक जीव वाचवण्यासाठी बंकर्समध्ये आणि रेल्वे स्थानकांवर राहत आहेत. आज सातव्या दिवशी तर खारक्यीव आणि सूमीमध्ये जोरदार हल्ले चढवण्यात आले आहेत. बॉम्ब हल्ले, मिसाईल अटॅक्स आणि अंधाधुंद गोळीबार यामुळे युक्रेनच्या अनेक शहरात आगडोंब उसळला असून नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे.

रशियाने युक्रेनच्या खेरसनमध्ये आज जोरदार हल्ले केले. त्यामुळे अनेक इमारती आणि घरे पेटली असून धुराचे लोट संपूर्ण आकाशभर पसरले आहेत. जोरदार धमाक्यांच्या आवाजाने स्थानिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.खारकीवमधील मेडिकल सेंटरवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे खारकीवचं मेडिकल सेंटर संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. हे मेडिकल सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं असून या परिसरात चिटपाखरूही फिरताना दिसत नाही.

रशियाने सर्वाधिक टार्गेट क्यीव शहराला केलं आहे. क्यीव शहर ही रशियाची राजधानी आहे. त्यामुळे रशियाने क्यीववर मिसाईलचा जोरदार मारा करत आहेत. त्यामुळे क्यीवमध्ये वारंवार सायरन वाजवून नागरिकांना अलर्ट केलं जात आहे. त्यांना घराबाहेर न पडण्याचं आणि बंकर्सचा आश्रय घेण्यास सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे सायरनचा आवाज ऐकताच नागरिकांच्या काळजात धस्स होत असून भीतीने त्यांची गाळण उडाली आहे.

युक्रेनवरील हल्ल्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य लोकांना बसला आहे. गेल्या सात दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध कधी संपेल याची काहीच शाश्वती नसल्याने युक्रेनमधून अनेक लोक बाहेरच्या देशात आश्रयाला जात आहेत. आतापर्यंत सात लाख लोकांनी युक्रेन सोडल्याचं सांगण्यात येत आहे. आजूबाजूच्या पोलंडसारख्या देशात हे लोक आश्रय घेत असून बॉर्डरवर नागरिकांचे जत्थेच्या जत्थे दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments