Wednesday, July 15, 2026
Homeअर्थविश्वभिशी लावण्याच्या बहाण्याने ६५ नागरिकांना दोन कोटींचा गंडा ; तिघांवर गुन्हा दाखल

भिशी लावण्याच्या बहाण्याने ६५ नागरिकांना दोन कोटींचा गंडा ; तिघांवर गुन्हा दाखल

५ ऑगस्ट २०२१,
उचल भिशी लावण्याच्या बहाण्याने ६५ नागरिकांचा विश्वास संपादन करून रोख आणि डिजिटल माध्यमातून पैसे स्वीकारून दोन कोटी चार लाख रुपये घेऊन कुटुंब फरारी झाले आहे. ही घटना २०१९ ते २८ जून २०२१ या कालावधीत रहाटणी येथे घडली.

परशुराम सातपुते (वय ५०), सागर परशुराम सातपुते (वय ३८), पुष्पा सातपुते (वय ४५, सर्व रा. आईसाहेब निवास, सज्जनगड कॉलनी, रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महेश बाबूराव घाटे (वय ३७, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपी गेल्या २० ते २५ वर्षांपासून भिशी घेतात. त्यातून त्यांनी परिसरातील अनेक नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. घाटे यांच्यासह ६४ नागरिकांचा आरोपींनी विश्वास संपादन करून भिशी लावण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून रोख आणि डिजिटल माध्यमातून पैसे स्वीकारले. त्यानंतर भिशीपोटी जमा झालेले दोन कोटी चार लाख २४ हजार ११० रुपये घेऊन सातपुते कुटुंबीय फरारी झाले आहेत. आरोपींनी या व्यतिरिक्त आणखी काही नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments