Thursday, May 23, 2024
Homeताजी बातमीनागरिक अहंकार स्वीकारत नाहीत म्हणून त्यांचा पराभव अटळ रोहित पवार यांची बंडखोर...

नागरिक अहंकार स्वीकारत नाहीत म्हणून त्यांचा पराभव अटळ रोहित पवार यांची बंडखोर राहुल कलाटेवर टीका

बंडखोर राहुल कलाटे हे अहंकाराची भाषा बोलत आहेत. त्यांना वीस हजार मते पडतील. नागरिक अहंकार स्वीकारत नाहीत असा हल्लाबोल राष्ट्रवादी चे आमदार रोहित पवार यांनी बंडखोर राहुल कलाटे यांच्यावर केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडी चे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आले होते.

रोहित पवार म्हणाले की, नाना काटे हे प्रचंड मतांनी विजयी होतील. जगताप कुटुंबा बद्दल नागरिकांमध्ये सहानुभूती आहे. पण, भाजपाला आम्ही मत देणार नाही उलट राष्ट्रवादीला निवडून आणणार असल्याचे वातावरण नागरिकांमध्ये आहे. अजित पवार यांनी केलेला विकास हे नागरिक विसरले नाहीत. पुढे ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष हे काहीही बोलले तरी खरे होणार आहे का? उलट राष्ट्रवादी चा उमेदवार निवडून येईल आणि प्रदेशाध्यक्ष यांना झटका बसेल. वंचितमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहिले आहे. भाजपा संविधानाच्या विरोधात आहेत. तसे बघायला गेल्यास वंचित देखील भाजपा विरोधी पाहिजे.

वंचितचा फायदा भाजपाला होतो हे लोकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना कळते. त्यांचे कार्यकर्ते हुशार आहेत. भाजपाला मदत होईल असे काम ते करतील असे मला वाटत नाही. पुढे ते म्हणाले की, राहुल कलाटे हे वीस हजारांच्या पुढे जाणार नाहीत. ते जे आज बोलत आहेत ते अहंकाच्या भाषेत ते बोलत आहेत. लोकं अहंकार स्वीकारत नसतात असा टोला त्यांनी राहुल कलाटे यांना लगावला आहे. राष्ट्रवादी चे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पार्थ पवार येणार का? या प्रश्नावर बोलताना रोहित म्हणाले की, माझे त्यांच्याशी बोलणे झाले नाही. पण, त्याचे वडील (अजित पवार) प्रचारात असतील तर मुलाचा काय विषय असे रोहित पवार म्हणाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments