Sunday, May 17, 2026
Homeअर्थविश्व...म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करा; पेट्रोल-डिझेलवरून रोहित पवार यांचा केंद्राला सल्ला

…म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करा; पेट्रोल-डिझेलवरून रोहित पवार यांचा केंद्राला सल्ला

देशातील अनेक भागात पेट्रोलचे दर प्रति लिटर शंभर रूपय पार गेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी केली जात आहे. यातच केंद्रीय अर्थमंत्रालय पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी पावलं उचलणार असल्याची माहिती आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान आणि निर्मला सीतारामन यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांबद्दल ट्विट केलं आहे. “पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साईज ड्युटी (उत्पादन शुल्क) कमी करण्याचा केंद्राचा विचार स्वागतार्ह आहे; मात्र एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो, सेसमध्ये मिळत नाही म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करावा. केंद्र सरकार याचा गांभीर्याने विचार करेल, ही अपेक्षा!,” असं रोहित पवार यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments