Tuesday, September 10, 2024
Homeताजी बातमीअफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रॉकेट हल्ला.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रॉकेट हल्ला.

21 November 2020.

अमेरिका-तालिबान चर्चेआधी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रॉकेट हल्ला झाला आहे. यात कमीत कमी 8 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 30 जण जखमी झाले आहेत.

शनिवारी सकाळी काबूलच्या एका रहिवाशी भागात दोन कारमधून जवळपास 20 मॉर्टर्स झाडण्यात आले. या हल्ल्यात अनेक इमारती आणि कारचं नुकसान झालं. मात्र, आपण हे हल्ले केले नसल्याचं तालिबानचं म्हणणं आहे.

तालिबानसोबत शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो दोहामध्ये तालिबानच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीलाच ट्रम्प प्रशासनाने जानेवारीच्या मध्यापर्यंत अफगाणिस्तानातून 2000 अमेरिकी जवानांना माघारी बोलावलं जाईल, अशी घोषणा केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments