पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने आयुक्तांनी शहरात निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान सोमवारी (दि. २४) रोजी आयुक्तांनी काहीसे निर्बंध आदेशान्वये शिथिल केले आहेत.
आयुक्तांनी महापालिका हद्दीतील जलतरण तलाव फक्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होणा-या खेळाडू व प्रशिक्षक यांच्या सरावासाठी खुली केली आहेत. सर्व उद्याने सकाळी ०६.०० ते ० ९.०० यावेळेत सुरु राहतील. शिवाय खुली मैदानेही सुरु राहतील. आस्थापनांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण, सॅनिटायझेशन याबाबतच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६०, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.