Monday, June 15, 2026
Homeताजी बातमीकलाकारांचा सन्मान आणि मराठी सिनेसृष्टीच्या विकासासाठी समर्थ पॅनलला पाठिंबा; भाऊसाहेब भोईर यांचे आवाहन

कलाकारांचा सन्मान आणि मराठी सिनेसृष्टीच्या विकासासाठी समर्थ पॅनलला पाठिंबा; भाऊसाहेब भोईर यांचे आवाहन

पिंपरी, पुणे (दि. ३० मे २०२६): कलाकारांचा सन्मान आणि मराठी सिनेसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवारांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समर्थ पॅनलचे प्रमुख व निर्माता पदाचे उमेदवार मेघराज राजे भोसले, सुनील महाजन, दिग्दर्शक पदाचे उमेदवार अजित शिरोळे, लेखक पदाचे उमेदवार राज काझी तसेच गौरी लोंढे, संजय ठुबे आदी उपस्थित होते.

भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व घटकांना एकत्रितपणे पुढे नेण्यासाठी समर्थ पॅनल कार्यरत राहील. मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी सभासदांकडून समर्थ पॅनलला भरघोस मतदान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मेघराज राजे भोसले यांनी सांगितले की, मराठी चित्रपट आणि कलाकारांच्या विकासासाठी समर्थ पॅनल सक्षम नेतृत्व देण्यास सज्ज आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा विकास हेच ध्येय समोर ठेवून भाऊसाहेब भोईर यांनी स्वतःची उमेदवारी मागे घेत निर्माता गटातील उमेदवार सुनील महाजन यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या मोठ्या मनाच्या निर्णयामुळे समर्थ पॅनल अधिक बळकट झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

कलाकारांचा सन्मान – मराठी सिनेसृष्टीचा विकास” हे ब्रीदवाक्य घेऊन समर्थ पॅनल निवडणूक लढवत असून, कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कामगार आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींना न्याय देणारे प्रभावी नेतृत्व देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व सभासदांनी पतंग या चिन्हासमोरील बटण दाबून समर्थ पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन मेघराज राजे भोसले यांनी केले.

समर्थ पॅनलच्या अधिकृत उमेदवारांमध्ये निर्माता गटासाठी सुनील महाजन, दिग्दर्शक पदासाठी दीपक कदम (मुंबई), अभिनेता पदासाठी सुशांत शेलार (मुंबई), छायाचित्रण पदासाठी धनाजी यमकर (कोल्हापूर), नृत्य पदासाठी सुभाष नकाशे (मुंबई), ध्वनी पदासाठी शरद चव्हाण (कोल्हापूर), कलादिग्दर्शक पदासाठी प्रवीण (वासू) पाटील (सातारा), वेशभूषा पदासाठी चैत्राली डोंगरे (मुंबई), निर्मिती व्यवस्था पदासाठी रवी गावडे (कोल्हापूर), प्रसिद्धी पदासाठी गणेश गारगोटे (मुंबई) आणि कामगार पदासाठी विकास तोरणे (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

समर्थ पॅनल मराठी चित्रपटसृष्टीसमोरील विविध प्रश्न सोडविणे, कलाकार व तंत्रज्ञांच्या हक्कांचे संरक्षण करणे, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, डिजिटल माध्यमांशी सुसंगत धोरणे राबविणे तसेच महामंडळ अधिक सक्षम, पारदर्शक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सुनील महाजन यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments