पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात काल रात्री एका निवासी डॉक्टरला झाली होती. या घटनेचा निषेध करत निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. रुग्णालयातील १४८ निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. अत्यावश्यक सेवा विभागातील निवासी डॉक्टरही या संपात सहभागी असल्याने यंत्रणांवर मोठा ताण पडत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात काल रात्री एका निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवायकांनी मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.