Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीटीआरपी घोटाळा प्रकरणी 'रिपब्लिक टीव्ही'च्या पाच गुंतवणूकदारांना समन्स

टीआरपी घोटाळा प्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’च्या पाच गुंतवणूकदारांना समन्स

२७ ऑक्टोबर २०२०,
पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रिपब्लिक टीव्हीच्या पाच गुंतवणूकदारांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहेत. आर्थिक उत्पन्नाचे स्रोतही तपासण्यात येणार असल्याने रिपब्लिकच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

टीआरपी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर यामध्ये सहभाग आढळलेल्या वाहिन्यांच्या आर्थिक व्यवहारांचे गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले आहे. आरपीजी पावर ट्रेडिंग, अनंत उद्योग एलएलपी, पूर्वांचल लिझिंग, पॅन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि डायनामिक स्टोरेज अँड रिट्रीव्हल सीस्टीम या कंपन्या रिपब्लिक वाहिनीत गुंतवणूकदार आहेत. आरपीजी कंपनीने १०; तर अनंत उद्योग एलएलपीने ७.५ कोटींची गुंतवणूक रिपब्लिक वाहिनीत केली आहे. रिपब्लिक वहिनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्याने गुंतवणूकदारांकडे चौकशी केली जाणार आहे.

टीआरपी घोटाळ्यामध्ये हंसा रिसर्च ग्रुप ही कंपनी तक्रारदार आहे. हंसा आणि रिपब्लिक वाहिनीमधील आर्थिक व्यवहारही उघड झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. टीआरपी मोजण्यासाठी बार्कने ग्राहकांच्या घरी बसविलेल्या बॅरोमिटर यंत्रांची डागडुजी, देखभालीसाठी हंसा कंपनीची नियुक्ती करण्यात आली. मात्र, रिपब्लिकसोबतच्या आर्थिक व्यवहारांबाबत हंसा कंपनीने बार्कला काहीच कळविले नसल्याचेही समोर आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments