भाजपा युवा मोर्चाचा लक्षवेधी उपक्रम ,शहराध्यक्ष संकेत चोंधे यांची माहिती
देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ वी जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत शहरातील अनेक विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे मोरवाडी येथील संपर्क कार्यालयात या स्पर्धा घेण्यात आल्या. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष पंकज शर्मा यांनी केले. परीक्षक म्हणून आकाश पाटील, प्रवीण शिंदे हे उपस्थित होते.
यावेळी माजी उपमहापौर तुषार हिंगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजित कुलथे, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख अमित गुप्ता, सरचिटणीस दिनेश यादव, पंकज शर्मा, शिवराज लांडगे, संदीप नखाते, प्रसाद कस्पटे, देविदास तांबे, प्रियंका शाह, युवराज ढोरे, भावना पवार, सतिश जरे, दिपक नागरगोजे, गोपल मंडल, गोरोबा शेळके, गिरीश देशमुख, तात्या शिनगारे, सचिन उदागे, विक्रांत गंगावणे, साहेबराव देवळे आदी उपस्थित होते.
रोहन कवडे पहिल्या क्रमांकाचा मानकरी…
या स्पर्धेत प्रथम क्रमांक रोहन कवडे, द्वितीय क्रमांक तेजस पाटील आणि तृतीय क्रमांक शुभम मोटे यांचा आला. वक्तृत्व स्पर्धेसाठी नरेंद्र मोदी यांचा डिजिटल सुशासनावर भर देतो, भारत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, फुकटच्या राजकारणातून विकासाच्या राजकारणाकडे जाणे काळाची गरज आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे युवकांच्या सक्षमीकरणावर लक्ष्य आहे, हे विषय देण्यात आले होते.