Monday, October 7, 2024
Homeअर्थविश्वकरदात्यांना दिलासा , टॅक्स स्लॅबमध्ये बदल.. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त, जाणून घ्या...

करदात्यांना दिलासा , टॅक्स स्लॅबमध्ये बदल.. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त, जाणून घ्या नवीन कर रचना

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता, करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात टॅक्स स्लॅबबाबत घोषणा केली. आता, सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.

उत्पन्न प्राप्तिकर
0 से तीन लाख 0 टक्के
3 से 6 लाख 5 टक्के
6 से 9 लाख 10 टक्के
9 से 12 लाख 15 टक्के
12 से 15 लाख 20 टक्के
15 लाख से ज्यादा 30 टक्के

प्राप्तिकर सवलत मर्यादा 2.50 लाखांवरून 5 लाख करण्याची आवश्यकता आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मागील काही वर्षांपासून टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. सरकारकडून टॅक्सबेस वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आयकर रिटर्न दाखल करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.सरकारने टॅक्स स्लॅब वाढवला तर करदाते वाचणाऱ्या पैशातून खरेदीकडे, गुंतवणुकीकडे वळतील. याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार असल्याचा अंदाज अर्थ तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

सध्या ज्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. ज्यांचे उत्पन्न 2.50 ते 5 लाख रुपये आहे, त्यांना 5 टक्के दराने म्हणजेच 12500 रुपये कर भरावा लागतो.

प्राप्तिकराच्या नियम 87A अंतर्गत, सरकार 12,500 रुपयांची कर सवलत देते. करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. ज्यांचे करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षाही अधिक आहे, त्यांना या सवलतीचा लाभ मिळत नाही. अशा लोकांना केवळ महागाई, आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर वाढलेला ईएमआय आदीमुळे खिशावर अधिकच ताण येतो.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत, ज्येष्ठ नागरिक सध्या कमाल 15 लाख रुपये जमा करू शकतात. ही मर्यादा 30 लाख रुपये करण्यात येणार आहे.महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा, दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येणार आहे. दोन लाखापर्यंतची रक्कम ठेवता येईल. 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments