Wednesday, June 18, 2025
Homeताजी बातमीपिंपरीतील विविध समस्यांसंदभार्त मा. खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांची आढावा...

पिंपरीतील विविध समस्यांसंदभार्त मा. खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांची आढावा बैठक

१२ जुलै २०२१,
पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई येथील विविध समस्या तसेच मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्पातील प्रकल्पातील लाभधारकांना सदनिका वाटप आदी विषयांबाबत खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांची आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत बैठक झाली.

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या बैठकीस माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहर अभियंता राजन पाटील, नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, सह शहर अभियंता रामदास तांबे, मकरंद निकम श्रीकांत सवणे, सहाय्यक आयुक्त तथा झोनिपुचे सक्षम प्राधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, देवन्ना गट्टूवार, अनिल शिंदे, संजय खाबडे, अजय सूर्यवंशी, थॉमस नरोन्हा, उपअभियंता संजय खरात, शेखर गुरव आदी उपस्थित होते.

यावेळी पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, मंडईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, साफसफाई तसेच मंडईची रंगरंगोटी करणे तसेच लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई असा एलईडी नामफलक लावणे, पिंपरी येथे वाहनतळ उभारणे आदी बाबत खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा केली. तसेच मिलिंदनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील लाभधारकांना तातडीने सदनिका वाटप करण्याच्या सूचनाही यावेळी खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांनी अधिका-यांना केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments