१७ नोव्हेंबर २०२०,
सुपरस्टार धनुषचं अजून एक गाणं सुपरहिट झालं आहे. तमिळ सिनेमा ‘मारी- २’ मध्ये धनुष ‘राउडी बेबी’ गाण्यावर थिरकला होता. या गाण्याला यू-ट्यूबवर १ अब्ज लोकांनी पाहिलं आहे. हे पहिलं दक्षिण भारतीय गाणं आहे, ज्याला यूट्यूबवर इतक्या लोकांनी पाहिलं आहे. ‘मारी- २’ हा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. धनुष आणि धी यांनी हे गाणं गायलं होतं.
धनुषने ट्वीट करत हा एक गोड योगायोग असल्याचं म्हटलं. ‘राउडी बेबी’ने १ अब्ज व्ह्यूअरचा विक्रमही त्याच दिवशी केला जेव्हा ‘कोलावरी डी’ गाणं प्रदर्शित होऊन नऊ वर्ष झाली. या दक्षिण भारतीय गाण्याला अब्ज व्ह्यू मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमची संपूर्ण टीम आपणा सर्वांचं मनापासून अभिनंदन करते. धनुषची को-स्टार साई पल्लवी हिनेही ट्वीट केलं. तिने लिहिले की राउडी बेबी गाण्याचा स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद. एक अब्ज प्रेम आणि अजूनही मोजणी सुरुच आहे.

धनुष पुन्हा एकदा गायला सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी अतरंगी सिनेमात धनुष एक गाणं गाणार आहे. विशेष म्हणजे एआर रहमान यांनी या सिनेमाला संगीत देणार आहेत.