पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्केटींग खेळाडू दुर्गा मिरजकर, वेदमूर्ती विनायक रबडे आणि पीएचडी पदवी प्राप्त डॉ. प्रियंका साखरे यांचा आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, आयुक्त राजेश पाटील, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सागर आंगोळकर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदी उपस्थित होते.
डॉ. प्रियंका राम साखरे यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था पवईमधून ऑरगॅनिक केमेस्ट्री या विषयात पी.एच.डी प्राप्त केली आहे. डॉ. साखरे यांच्या वतीने त्यांचे वडील राम साखरे यांनी सत्कार स्विकारला. दुर्गा गणेश मिरजकर हिने स्पिड स्केटिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर ३ पदके तर विभाग स्तरावर ४ सुवर्ण पदक पटकाविले आहे. वेदमुर्ती विनायक शेखर रबडे यांनी वेदशास्त्रामध्ये षडंगवित घनपाठी ही पदवी प्राप्त केली आहे. वयाच्या बाराव्या वर्षी ऋग्वेद दशग्रंथ घनपाठ हा एकच ध्यास धरून सलग १८ वर्षे त्यांनी अध्ययन केले आहे. त्यांच्यावतीने वडील चंद्रशेखर रबडे आणि आई हेमांगी रबडे यांनी सत्कार स्विकारला.