सर्वसामान्य नागरिकांना जोरदार धक्का देत देशाची केंद्रीय बँक रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दरात वाढ जाहीर केली आहे. सोमवार ६ फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत आरबीआयने व्याजदरात २५ बेस पॉईंटने वाढ जाहीर केली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आरबीआयने पतधोरण नुकतेच जाहीर केले. लक्षणीय आहे की आरबीआयने रेपो दरात सहाव्यांदा वाढ केली असून बँकेचा व्याजदर ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर आता गृहकर्जापासून सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत.
२० लाखाच्या गृहकर्जावर किती EMI
जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँकेकडून (एसबीआय) २० वर्षासाठी २५ लाखाचे गृहकर्ज घेतले असल्यास तुम्ही आधी ८.६० टक्के व्याजदराने २१ हजार ८५४ रुपयाचा ईएमआय भरत होता. पण आता व्याजदर २५ बेस पॉईंटने वाढल्याने बँकेचा व्याजदर ८.८५ टक्क्यांपर्यंत वाढेल, ज्यानुसार तुम्हाला २२ हजार २५३ रुपये EMI भरावा लागेल. म्हणजेच तुमचा ईएमआय सुमारे ४० रुपयांनी महाग होईल.
५० लाखाच्या गृहकर्जावरील EMI
जर तुम्ही यापूर्वी १५ वर्षासाठी ५० लाखाच्या गृहकर्जावर ८.६० टक्के दराने ४९ हजार ५३१ रुपये ईएमआय देत होता. तर दरवाढीनंतर तुमचा ईएमआय सुमारे ७३७ रुपयांनी वाढेल आणि तुम्हाला ५० हजार २६८ रुपये ईएमआय भरावा लागेल.