Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रकर्जवसुलीसाठी मनमानी करणाऱ्या एजंट्सच्या मुजोरीला लगाम , RBI च्या नव्या नियमांचे पालन...

कर्जवसुलीसाठी मनमानी करणाऱ्या एजंट्सच्या मुजोरीला लगाम , RBI च्या नव्या नियमांचे पालन करण्याचे वित्तीय संस्थाना निर्देश

रिझर्व्ह बँकेची थकीत कर्जाच्या वसुलीबाबत ग्राहकांना केल्या जाणाऱ्या फोनसाठी नवी नियमावली. वसुली एजंट कर्जधारकांना सकाळी आठपूर्वी आणि सायंकाळी सातनंतर फोन करू शकणार नाही. धमकीही देऊ शकणार नाही. वसूली एजंट्ससाठी आचारसंहिता बनवण्याचे निर्देशही आरबीआयनं बँकांना दिले आहेत.

बँकेचे रिकव्हरी एजंट तुम्हाला कर्ज वसुलीसाठी कोणत्याही वेळी फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत. यासोबतच वसुली एजंट्सना कर्जधारकांना कोणत्याही प्रकारची धमकी देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं गुरुवारी थकित कर्जाच्या वसुलीसाठीची नियम अधिक कठोर करण्याचा प्रस्ताव दिला. या अंतर्गत, वित्तीय संस्था आणि त्यांचे वसुली एजंट कर्जदारांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर कॉल करू शकणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे.

RBI च्या ‘जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेवरील मसुदा सूचना’ (Draft Master Direction on Managing Risks and Code of Conduct in Outsourcing of Financial Services) मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार, बँका आणि NBFC सारख्या नियमन केलेल्या संस्थांनी (RE) प्रमुख व्यवस्थापनाची कार्य आउटसोर्स करू नयेत. या कामांमध्ये पॉलिसी तयार करणं आणि KYC नियमांचं पालन करणं आणि कर्ज मंजूर करणं यांचा समावेश होतो.

बँकांनी वसुली एजंटांसाठी आचारसंहिता बनवावी, RBI चे निर्देश
आरबीआयनं म्हटलं आहे की, RE नं हे सुनिश्चित केलं पाहिजे की, ग्राहकांप्रती त्यांची जबाबदारी आउटसोर्सिंग व्यवस्थेमुळे कमी होणार नाही. मसुद्यानुसार, बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (NBFCs) डायरेक्ट सेलिंग एजंट (DSA), डायरेक्ट मार्केटिंग एजंट (DMA) आणि कलेक्शन एजंट्ससाठी आचारसंहिता तयार करावी.

रिकव्हरी एजंट्सनी कर्जधारकांशी संयमानं अन् व्यवस्थित बोलावं…
DSA, DMA आणि पुनर्प्राप्ती एजंट योग्यरित्या प्रशिक्षित आहेत की नाही, हे नियमन केलेल्या संस्थांनी सुनिश्चित केलं पाहिजे. जेणेकरून ते त्यांच्या जबाबदाऱ्या संवेदनशीलतेनं पार पाडतील. मध्यवर्ती बँकेनं असं म्हटलं आहे की, RE आणि त्यांचे वसुली एजंट कर्जाची वसुली करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीसोबत शाब्दिक किंवा शारीरिक, तसेच, कोणत्याही प्रकारची धमकी किंवा छळ करणार नाहीत. यासह, वसुली एजंट कर्जदारांचा सार्वजनिकपणे अपमान करू शकत नाहीत किंवा त्यांच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments