शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो असा खळबळ जनक दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला सध्याच्या बद्दल बदलांच्या हंगाम सुरू आहे आणि या बदलांसाठी लाखोंच्या पट्टी दर निघाले असल्याची शेट्टी म्हणाले तसेच त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे रेट काढून जाहीर करत बदलांच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.
तलाठी पासून कलेक्टर पर्यंत बदलांच्या नावाखाली कोट्यावधीचा भ्रष्टाचार होत आहे असा आरोप करत त्यांनी बदल्यांचे रेट कार्डही जाहीर केले. तलाठ्याच्या बदलीसाठी पाच लाख तसेच तहसीलदारासाठी 25 लाख तर जिल्हाधिकारी यांच्या बदलीसाठी पाच कोटींचे दर ठरले असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला. शिक्षण संचालक अभियंता पोलीस अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी यांच्यासाठी एक रेट का ठरलेले आहेत.
शासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेच्या कामात अडथळे निर्माण निर्माण करून त्यांना त्रास दिला जातो जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत व्यक्तीचा प्रस्ताव पुढे जात नाही एकूणच आज प्रत्येक कामात भ्रष्टाचार करण्याची अधिकाऱ्यांची वाढलेली हिम्मत लक्षात घेता त्यांच्या मानगुटीवर व्यवस्थेतील बदली नावाची सुरी फिरवली फिरवली असल्याचे स्पष्ट जाणून लागले आहे असेही मत त्यांनी स्पष्ट केले