Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमीCBSE Exam Date Sheet 2021: सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकाची...

CBSE Exam Date Sheet 2021: सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकाची रमेश पोखरियालांकडून घोषणा, वाचा कुठे मिळेल वेळापत्रक

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालं आहे. अखेर विद्यार्थ्यांना विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. 4 मे ते 10 जून या काळात ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झालं आहे.

सीबीएसईच्या बोर्ड परीक्षा 4 मेपासून सुरु आहेत. हळूहळू कोरोनातून आपण मुक्त होत आहोत. कोरोनाचा समर्थपणे आपण सामना केला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देत आहे. दोन कोरोना लसी उपलब्ध असल्यामुळे घाबरु नका. परीक्षेची डेट शीट देताना आनंद होत असल्याचं रमेश पोखरियाल निशंक म्हणाले.

विद्यार्थ्यांना परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड एप्रिलममध्ये मिळण्याची शक्यता आहे. यंदा परीक्षेचा अभ्यासक्रमही 30 टक्क्यांनी कमी करण्यात आलाय. त्यामुळेच यंदाच्या परीक्षांमध्ये 33 टक्के पर्यायी निवडीचे प्रश्न असणार आहेत.

सीबीएसईचं वेळापत्रक कसं पाहाल?

1. सर्वात आधी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in आणि www.cbse.gov.in ला भेट द्या.
2. ‘Latest@CBSE’ लिंकवर क्लिक करुन आपला वर्ग निवडा.
3. यानंतर तुमच्या वर्गाप्रमाणे इयत्ता दहावी किंवा बारावीचं वेळापत्रक दिसेल.
4. या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करु शकता किंवा सेव्ह करुन प्रिंट करु शकता.

परीक्षेच्या वेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. सर्व शाळांमध्ये 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षांचा निकाल जुलै 2021 पर्यंत घोषित होईल, असा अंदाज आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments