रमेश बैस यांची 23वे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणनू नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच ते राज्यपाल पदाचा पदभार स्विकारतील
रमेश बैस 1978 मध्ये रायपूरच्या नगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आले. त्यांनी 1980 ची विधानसभा निवडणूक मंदिर हसद मतदारसंघातून जिंकली. परंतु 1985 ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी सत्यनारायण शर्मा यांच्याकडून हरली. 1989 मध्ये रायपूरमधून 9व्या लोकसभेचे सदस्य म्हणून ते पहिल्यांदा भारतीय संसदेत निवडून आले. 1996 ते 11व्या, 12व्या, 13व्या, 14व्या, 15व्या आणि 16व्या लोकसभेपर्यंत सलग पुन्हा निवडून आले. त्यांनी पोलाद, खाण, रसायने आणि खते, माहिती आणि प्रसारण आणि खाण आणि पर्यावर, वन राज्यमंत्री यांसारख्या विविध खाती सांभाळली आहेत. वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मे 2004 पर्यंत काम केले आहे. जुलै 2019 ते जुलै 2021 या कालावधीत कप्तान सिंग सोलंकी यांच्यानंतर त्रिपुराचे 18 वे राज्यपाल म्हणून काम केले.