Friday, September 29, 2023
Homeअर्थविश्वमराठी चित्रपटसृष्टीत पिंपरी चिंचवडचे नाव सुप्रीम करणारे राजेंद्र शिंदे यांचा " पिंपरी...

मराठी चित्रपटसृष्टीत पिंपरी चिंचवडचे नाव सुप्रीम करणारे राजेंद्र शिंदे यांचा ” पिंपरी चिंचवड सन्मान ” पुरस्काराने होणार सन्मान..

पिंपरी चिंचवड ची ओळख औद्योगिक नगरी, कामगार नगरी सोबतच आता सांस्कृतिक नागरी म्हणून उदयास येत आहे. पिंपरी चिंचवड शहराला स्वतःची सांस्कृतिक ओळख नाही आजपण शहरात सांस्कृतिक क्षेत्राला पोषक वातावरण नाही परंतु अशा परिस्थितीत हि काही मंडळी आहेत जे आज पण पिंपरी चिंचवड शहराला नवी सांस्कृतिक ओळख देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत.अशीच एक चित्रपट निर्मिती संस्था आकुर्डी पिंपरी चिंचवड येथील सुप्रीम मोशन पिक्चर्स च्या माध्यमातून आजोबा , कॉफी आणि बरेच काही , बॉईज १, बॉईज २ आणि वाघेऱ्या अशा अनेक दर्जेदार चित्रपटाची निर्मिती करून पिंपरी चिंचवड शहराचे नाव चित्रपट क्षेत्रात उज्ज्वल करत आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्सचे संचालक मा. श्री. राजेंद्र शिंदे यांच्या या कार्याची दाखल घेत न्युज १४ नेटवर्क च्या वतीने त्यांना ” पिंपरी चिंचवड सन्मान ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आपला मूळ व्यवसाय सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून फॅसिलिटी मॅनेजमेंट , ट्रान्सपोर्ट , पार्किंग मॅनेजमेंट , फॅक्टरी मॅनेजमेंट अशा विविध सेवा पुरवत असताना अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या सोबत सुप्रीम मोशन पिक्चर्स या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करून केवळ मुबंईत होत असलेली चित्रपट निर्मितीची प्रक्रिया त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात राबवली त्याद्वारे शहरातील टॅलेंटेड युवकांना संधी मिळली सुजय डहाके सारख्या दिग्दर्शकाला आजोबा नावाचा सिनेमा करायला मिळला या सिनेमा द्वारे उर्मिला मातोंडकर सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मराठी चित्रपटात प्रवेश झाला. महाराष्ट्रातील युवकांना वेड लावणारे नव्या संकल्पनेचे कॉफी आणि बरेच काही , बॉईज १, बॉईज २ ह्या चित्रपटांची निर्मिती करून पिंपरी चिंचवडचा झेंडा मराठी चित्रपट इंडस्ट्रीज मध्ये फडकवत ठेवला आहे. भविष्यात असे अनेक नाव नवीन चित्रपटाची निर्मिती करून युवकांना तसेच नवीन दिगदर्शकांना संधी देण्याचे काम सुप्रीम मोशन पिक्चर्स च्या माध्यमातून करणार असे राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान पद्मश्री गिरीश प्रभूणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ” पिंपरी चिंचवड सन्मान ” ( सन्मान कार्याचा – गौरव शहराचा ) पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि पिंपरी चिंचवडचेपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अविनाश कांबीकर यांनी प्रसिद्धीस दिलीआहे.

कार्यक्रमाची माहिती

” पिंपरी चिंचवड सन्मान” ‘सन्मान कार्याचा – गौरव शहराचा’

कोठे पार पडणार,

स्थळ ;- ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड पुणे -१९

दिनांक आणि वेळ

गुरुवार ७ एप्रिल २०२२, सायंकाळी ५ वाजता..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments