Monday, April 22, 2024
Homeताजी बातमी" कविकट्टा संयोजनपदी राजन लाखे यांची डबल हट्रीक " ९४ वे अखिल...

” कविकट्टा संयोजनपदी राजन लाखे यांची डबल हट्रीक ” ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

३ फेब्रुवारी २०२१,
नाशिक येथे २६ ते २८ मार्च रोजी संपन्न होणार्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा या लोकप्रिय व्यासपीठाच्या प्रमुखपदी कवी राजन लाखे यांची ६ व्यांदा निवड झाली आहे. पिंपरी पुणे येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून आजपर्यंत सलग पाच वर्षे शिस्तबद्ध पध्दतीने कविकट्टा चे नियोजन करणारे राजन लाखे यांना मराठी साहित्य महामंडळाने यंदाही कविकट्टा संयोजनाचा मान दिल्यामुळे लाखे यांची डबल हट्रीक साधली गेली आहे.

राजन लाखे हे महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष असून मसाप पुणे चे जिल्हा प्रतिनिधि आहेत. नवोदित तसेच प्रस्थापीत कवी, कवयित्री साठी कविकट्टा या व्यासपीठाची भव्यता आणि लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. नियोजनबद्ध कविकट्टा राबविण्यासाठी भारतातून कवितां मागविणे, त्याची छाननी करणे, त्यामधून निवड समिती द्वारे दर्जेदार कवितांची निवड करणे, निवड झालेल्या कवींच्या सादरीकरणासाठी वेळा पत्रक तयार करणे आणि वेळापत्रकानुसार कवींना निमंत्रित करून कवींना सन्मान प्रदान करणे ही कविकट्टाची प्रमुख वैशिष्ठे असून लाखे यांनी विकसित केलेल्या या पध्दतीमुळे कविकट्टास नवे वळण लागले आहे.

श्री राजन लाखे यांचशी संपर्क साधला असता संमेलनास उपस्थित राहणे शक्य नसलेल्या सहित्यिकांना व सर्वसामान्य रसिकांना कवितेचा आनंद घेता यावा म्हणून कविकट्टा फेसबुक लाइव करण्याचा मानस असल्याचे त्यांनी संगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments