Tuesday, September 10, 2024
Homeताजी बातमीराज ठाकरेचा शरद पवारांना फोन, राज्यपालांचा सल्ला आणला अंमलात.

राज ठाकरेचा शरद पवारांना फोन, राज्यपालांचा सल्ला आणला अंमलात.

31 October 2020

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली होती. त्या दरम्यान त्यांनी वाढीव वीजबिलबद्दल चर्चा केली होती. त्या वर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ह्यांनी राज ठाकरे ह्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला. आणि त्यामुळेच राज ठाकरे ह्यांनी शरद पवारांना फोन केला होता. अशी माहिती खुद्द शरद पवार ह्यांनीच दिली आहे. राज ठाकरे ह्यांनी राज्यपालाच्या सांगण्यावरून आपल्याला फोन केला होता , परंतु मी बाहेरगावी जाणार असल्याने भेटीबाबत काही ठरलं नाही अशी हि माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, वाढीव वीजबील आणि दूधदर ह्या मुद्यावरून राज्यपालाची भेट घेतली होती. लॉकडाऊनमुळे अनेकांनी आपले रोजगार गमावले असताना , वाढीव वीज बिल भरणे कठीण असल्याचे राज ठाकरे ह्यांनी राज्यपालांना सांगितले होते. त्यावर शरद पवारांशी बोलून घ्या असा सल्ला राज्यपालांनी त्यांना दिला होता. ह्यानंतर बऱ्याच राजकीय टीका टिपण्णी हि झाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments